जुहू येथील पालिकेच्या कूपर रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र सुरु


२ दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले केंद्राचे उद्घाटन
मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळविणे होणार सुविधाजनक

   मुंबई  ( प्रतिनिधी ) –   हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर सर्वोपचार रुग्णालय" हे ९४० खाटांचे पालिकेचे प्रमुख रुग्णालय जुहू विलेपार्ले (पश्चिम) परिसरात आहे. याच रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र केंद्रांचे उद्घाटन दोन दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. सुरुवातीला दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत सुरु राहणा-या या केंद्रामुळे मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना 'दिव्यांग प्रमाणपत्र' मिळविणे अधिक सुविधाजनक होणार आहे. ही सुविधा दिव्यांग व्यक्तींना मोफत स्वरुपात उपलब्ध असणार आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजना व सोयी सुविधा यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र पूर्वी केवळ शासकीय रुग्णालयांद्वारेच देण्यात येत असे. मात्र, याबाबत पालिका रुग्णालयांच्या स्तरावर देखील दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे निर्देश राज्य शासनाद्वारे देण्यात आले आहेत. यानुसार पालिकेच्या "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर सर्वोपचार रुग्णालय" येथील मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर असणा-या नोंदणी कक्षांच्या बाजूला 'दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र' सुरु करण्यात आले आहे दिव्यांग प्रमाणपत्र केंद्राद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना विहीत नमुन्यात व आवश्यक अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणेही गरजेचे आहे. यानंतर अर्जदारास आवश्यक त्या शारिरिक चाचण्यांसाठी तारीख व वेळ देण्यात येईल. या चाचण्यांनुसार ज्या व्यक्तींची दिव्यांग टक्केवारी ४० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यक्तीला दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना व सोयी सुविधांचा लाभ घेता येऊ शकेल, अशीही माहिती डॉ. गणेश शिंदे यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget