समता परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विक्रम परमार यांनी स्वखर्चाने भरले पाली शहराचे खड्डे
सुधागड /पाली
सुधागड तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर तीर्थक्षेत्र संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. येथे जगाच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.तसेच पालीला भेट देण्यासाठी  राज्यातील मंत्र्यांपासुन ते केंद्रातले केंद्र मंत्री सुद्धा येत असतात ते याच मार्गाने प्रवास करत असतात  मात्र  असे असून ही  पालीतील रस्त्याची दूरवस्था झालेली होती.    असे असानाही प्रशासन मात्र सुस्त होऊन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत होते.आशातच  पाली शहराच्या रस्त्याला खड्ड्यांचे लागलेला ग्रहण दूर करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे समता परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष उद्योजक विक्रमजी परमार यांनी स्वखर्चाने पाली रस्त्याचे खड्डे आपल्यापरीने भरायचे प्रयत्न केले आहे.

खड्या बाबत अनेक वेळा  वर्तमानपत्रांमध्ये  पाली रस्त्याची दुरावस्था  ही बातमी  लावण्यात आली .या बातमीचा प्रशासनाला जाग आली नाही.  पण पाली शहराचे  उद्योजक  सामाजिक  बांधिलकी जपणारे  विक्रम परमार  यांनी मात्र  स्वखर्चाने  खड्डे बुजवण्याचे काम केले. त्यांच्या कामामुळे  संपूर्ण पालीतील नागरिकांकडून  त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget