चौपाटयांवर करण्‍यात आलेली विद्युत रोषणाई पर्यटक वाढीसाठी तसेच सुरक्षिततेसाठी

चौपाटयांवर करण्‍यात आलेली विद्युत रोषणाई पर्यटक वाढीसाठी तसेच सुरक्षिततेसाठी
विविध सागरी किनाऱयावरील सुशोभित विद्युत रोषणाईचे महापौरांच्‍या हस्‍ते लोकार्पण

  मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) –   बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने चौपाटयांवर करण्‍यात आलेल्‍या विद्यूत रोषणाईमुळे पर्यटक वाढीस हातभार लागणार असून पर्यटकांची तसेच चौपाटयांच्‍या परिसरात राहणाऱया नागरिकांच्‍या सुरक्षिततेसाठी सुध्‍दा विद्यूत रोषणाई उपयुक्‍त ठरणार असल्‍याचे प्रतिपादन,  मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
बृहन्मुंबई महापालिकेच्‍या यांत्रिकी व विद्युत विभागातर्फे मालाड (पश्चिम ) येथील  अक्‍सा,  सिल्‍वर,  दानापानी,  एरगंळ,  मार्वे,  मनोरी या विविध सागरी  किनाऱयावर सुशोभित विद्यूत रोषणाई प्रकल्‍प राबविण्‍यात आला असून या प्रकल्‍पाचे उद्घाटन महापौरांच्‍या हस्‍ते पार पडले,  त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर,स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) अध्‍यक्षा श्रीम. साधना माने,  पी/उत्‍तर प्रभाग समिती अध्‍यक्षा श्रीम. जया तिवाना,स्थानिक नगरसेविका तथा कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षा श्रीम.संगिता सुतार, पी/उत्‍तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे,   माजी नगरसेवक अजित भंडारी व अनिल त्र्यंबककर तसेच संबंधित पालिका अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. महापौर महाडेश्‍वर बोलताना म्‍हणाले की,पालिका राबवित असलेल्‍या अनेक लोकोपयोगी उपक्रमांपैकी हा एक  उपक्रम असून स्‍थानिक नगरसेविका यांच्‍या पुढाकाराने येथील विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले असल्‍याचे महापौरांनी सांगितले. जूहू चौपाटीनंतर मालाड (पश्चिम ) येथील  अक्‍सा,  सिल्‍वर,  दानापानी,  एरगंळ,  मार्वे व मनोरी या विविध सागरी  किनाऱयावर दोन कोटी ४० लाख रुपये खर्चून १९८ विद्युत खांब बसविण्‍यात आले असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. आक्‍सा येथील जीवरक्षक व पर्यटकांसाठी शौचालयांची निर्मिती करण्‍यात यावी,  अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. त्‍याचप्रमाणे इमारतींचे नूतनीकरण करताना स्‍थानिक कोळीबांधवावर अन्‍याय होणार नाही याची पालिका अधिकाऱयांनी दक्षता घ्‍यावी अशी सूचनाही त्‍यांनी शेवटी केली.तर खासदार  गोपाळ शेट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले एक चांगली नागरी सुविधा पालिकेने उपलब्ध करुन दिल्‍याबद्दल त्‍यांनी संबधित अधिकाऱयांचे अभिनंदन केले. त्‍याचप्रमाणे आगामी काळात येणारा गणेशोत्‍सव एक वेगळया वातावरणात साजरा करता येईल असेही ते म्‍हणाले. उपनगरात जुहू चौपाटीनंतर अश्‍याप्रकारचे काम झाले असून याकामासाठी स्‍थानिक नगरसेविका यांचा पाठपुरावा व त्‍यांनाच या कामाचे  श्रेय जात असल्‍याचे खासदारांनी सांगितले.तसेच स्‍थानिक कोळीपुत्रांना त्‍यांची घरे दुरुस्‍ती करताना अडचणी येऊ नयेत, याची खबरदारी पालिकेने घ्‍यावी असेही ते शेवटी म्‍हणाले स्‍थानिक नगरसेविका तथा कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षा श्रीम.संगिता सुतार यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या पालिकेने याठिकाणी चांगली नागरी सुविधा उपलब्‍ध करुन दिली असून त्‍यासाठी ते अभिनंदनास पात्र असून आक्‍सा चौपाटीवर काम करणाऱया जीवरक्षक बंधू – भगिनींसाठी केबिन तसेच शौचालयांची निर्मिती करण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. प्रारंभी महापौरांच्‍या हस्‍ते विविध चौपाटयांवर फित कापून  तसेच विद्युत कळ दाबून या विद्यूत रोषणाई प्रकल्‍पाचे लोकार्पण करण्‍यात आले.यावेळी नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्‍थि‍ती होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget