प्रतिष्ठेच्या डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासाठी डॉ. अविनाश सुपे यांची निवड


प्रतिष्ठेच्या डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासाठी डॉ. अविनाश सुपे यांची निवड
डॉ. सुपे हे पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक
वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी 'मेडिकल कॉउन्सिल'द्वारे देण्यात येतात डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार

   मुंबई ( प्रतिनिधी ) –  पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांची वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या डॉ. बी.सी.रॉय राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याबाबत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांनी अधिकृत पत्राद्वारे कळवित डॉ. सुपे यांचे अभिनंदनही केले आहे. यानुसार 'एमिनंट मेडिकल टिचर' या वर्गवारीतील पुरस्कारासाठी डॉ. सुपे यांची निवड करण्यात आली आहे. तज्ज्ञ शल्यचिकित्सक अशी देशभरात ख्याती असणारे डॉ. अविनाश सुपे हे उत्तम प्रशासक असण्यासोबतच विद्यार्थी-प्रिय प्राध्यापक म्हणूनही ओळखले जात आहे
निष्णात डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. बिधान चंद्र रॉय यांना सन १९६१ मध्ये देशाच्या सर्वेाच्च सन्मानाने म्हणजेच भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते १ जुलै १८८२ रोजी जन्मलेल्या डॉ. रॉय यांचे निधन १ जुलै १९६२ रोजी झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १ जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेद्वारे वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग कार्य करणा-या व्यक्तींना सन १९६२ पासून डॉ. बी.सी. रॉय पुरस्काराने गौरविण्यात येते. 'डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार' हा वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जात आहे पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे हे राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केइएम हॉस्पीटल) व सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) म्हणूनही कार्यरत आहेत. डॉ. सुपे हे १९८३ पासून वैद्यकीय क्षेत्रात व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे डॉ. अविनाश सुपे यांनी त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण हे पालिकेच्याच के.इ.एम. रुग्णालय व सेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. तसेच शिकागो येथील 'युनिर्व्हसिटी ऑफ इलिनॉईस' येथून त्यांनी 'मास्टर्स इन हेल्थ प्रोफेशन्स एज्युकेशन' हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे. डॉ. अविनाश सुपे हे वर्ष १९८३ पासून पालिकेच्या केईएम रुग्णालयात विविध पदांवर कार्यरत आहेत.डॉ. सुपे यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध २६ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय विषयावर त्यांची ४ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये त्यांचे २४७ शोध निबंध देखील प्रकाशित झाले आहेत. विविध मराठी नियतकालिकांमधून त्यांनी लिखाण केले असून आरोग्य विषयावरील 'आरोग्य संपदा' हे त्यांचे मराठी पुस्तक सुप्रसिध्द आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget