जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळा प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर ठपका

जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळा प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर ठपका 
पालिका आयुक्ताना अहवाल सादर

मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी पालिका प्रशासनाने अखेर सहा अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे या भूखंडाच्या  गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांना आज मंगळवारी सादर करण्यात आला आहे या प्रकरणी या प्रकरणातील दोषींविरूध्द लवकरच कारवाई सुरु होणार आहे त्यामुळे विधी आणि विकास नियोजन विभागातील  अधिकाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत येत्या पालिका र-थायी समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात येणार आहे

मुंबईतील महत्त्वाच्या  जोगेश्वरी येथील 500 कोटींच्या भूखंडाचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण पालिका वतुॅळात चांगलेच गाजत आहे. गैरव्यवहार करताना आयुक्तांच्या सह्यांची अफरातफर करण्यात आल्याचे समोर आले आहे. राजकीय स्तरावर आणि पालिकेच्या स्थायी समितीत याप्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले होते याची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त मेहता यांनी पालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने विधी आणि विकास नियोजन खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन संबंधित अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला आहे. या वृत्ताला आयुक्तांनी दुजोरा देताना अहवाल वाचला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी घेतली आहे भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर ठपका ठेवण्यात आल्याची अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. यातील दोषींचा आकडा वाढण्याची  शक्‍यता व्यक्त होत आहे. यातील दोषींनी अशाच प्रकारच्या गैरव्यवहाराची अन्य प्रकरणे केली आहेत का, हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. 500 कोटी नव्हे 50 लाखाचा गैरव्यवहार  जोगेश्वरीतील जागांचा दर अत्यल्प आहे. त्यामुळे 500 कोटींच्या भूखंडाचा गैरव्यवहार होणे अशक्‍य आहे. येथील जागांचे दर पाहता, 50 लाख रुपये होऊ शकेल. मात्र, 500 कोटींच्या भूखडांचा घोटाळा, अशी बदमानी केली जात आहे, असे समजते  तसेच चौकशी अहवाल आयुक्तांना सादर झाल्याने यातील दोषीं आणि गैरव्यवहाराचा आकडा समोर येईल असे सांगण्यात येत आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget