बेस्टच्या बस थांब्यावर खासगी गाड्या आणि फेरीवाल्यांचा प्रचंड विळखा , नागरीक हैराण कारवाईचे अधिकार द्या - बेस्ट समिती अध्यक्ष


बेस्टच्या बस थांब्यावर खासगी गाड्या आणि फेरीवाल्यांचा
प्रचंड विळखा , नागरीक हैराण
कारवाईचे अधिकार द्या -  बेस्ट समिती अध्यक्ष
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टची आर्थिक स्थिती नाजूक आहे असे असताना  बेस्टचे बस थांबे खासगी गाड्या आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांनी वेढले आहेत. त्यामुळे बस थांब्यावर बस गाड्या थांबविणे मोठ्या प्रमाणात अडचणीचे झाले आहे. बस थांब्यावर अनधिकृतरित्या वाहने पार्क करणाऱ्यांवर तसेच फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार आता बेस्ट परिवहन विभागाला द्या, असे पत्र बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी पोलीसांच्या वाहतूक विभागाला दिले आहे. वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मंजुरी दिल्यानंतर याची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे
  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेबरोबर वाहणाची संख्या झपाटय़ाने वाढत आहे या वाहनाना मुंबईतील रर-ते कमी पडत असून बेस्टची आर्थिक स्थिती नाजूक आहे या  मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी वाढली आहे. खासगी वाहनांची तसेच फेरीवाल्यांची अतिक्रमणे बेस्टच्या बस थांब्यावर वाढली आहेत. जे.जे. उड्डाणपुलाखाली असणारे बस थांबे तर फेरीवाले आणि खासगी गाडया पार्क करणाऱ्यांच्या नावावरच झाल्याचे दिसून येते. दादर, मुंबई सेंट्रल, अँण्टॉंप हिल, घाटकोपर, मालाड, मालवणी, गोरेगाव या भागातील अनेक बस थांबे अतिक्रमणांनी व्यापले आहेत. त्यामुळे बेस्ट बस थांबे मोकळा श्वास कधी घेणार, असा सवाल प्रवाशी करीत आहेत. या अतिक्रमणांचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांच्या तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा प्रयत्न बेस्टने केला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. अनेक बस थांबे फेरीवाले आणि खासगी वाहने पार्किंगच्या विळख्यात आहेत. बेस्ट परिवहन विभागाच्या अंतर्गत 6324 बस थांबे आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणचे बस थांबे स्टीलचे केले असून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी बस थांब्यावर शेडही टाकण्यात आल्या आहेत. बेस्ट बस थांब्यापासून 15 मीटरपर्यंत गाडी पार्क करण्यास सक्त मनाई आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत गाड्या पार्किंग केल्या जातात. त्यामुळे बेस्टची मोठी अडचण होत आहे. महसूलावरही परिणाम होत आहे. त्यामुळे पोलीसांच्या वाहतूक विभागाने बेस्टच्या परिवहन विभागाला कारवाईचे अधिकार द्यावेत, कारवाईतून मिळणाऱ्या दंडापोटीचा महसूलही मिळेल, असेही बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिली

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget