सचिन तेंडुलकर याने अहिल्या- झूंज एकाकी मधील गाण्याविषयी केले ट्वीट

सचिन तेंडुलकरने अहिल्या- झूंज एकाकी मधील गाण्याविषयी केले ट्वीट

(मुंबई ) :- सर्वांचा आवडता सचिन सोशल मिडीयावर एखादी पोस्ट करतो तर त्याची चर्चा सर्वत्र होते. असेच काही घडले जेंव्हा सचिनने आगामी चित्रपट  "अहिल्या- झूंज एकाकी" विषयी पोस्ट केली. झाले असे की अलीकडेच शंकर महादेवन यांनी प्रविण कुवर यांनी संगीतबद्ध केलेले गीत रेकॉर्ड केले ते शब्दबद्ध केले आहे सचिनचे थोरले बंधु नितीन तेंडुलकर यांनी. आपल्या ट्विट मध्ये सचिन म्हणतोय मर्मभेदी स्वरांची हृदयस्पर्शी शब्दानां साथ लाभली आहे.  मी या गाण्याची आतुरतेने वाट बघतोय", तसेच शंकर महादेवन , नितीन तेंडुलकर , श्रीधर चारी, प्रविण कुवर , राजू पार्सेकर यांच्या नावांचा उल्लेख करून अभिनंदन केले.

या ट्वीटला रीट्वीट करत शंकर महादेवन यांनी सचिनचे आभार मानलेत आणि म्हटले की तुझे हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत खरच तुझा भाऊ  नितीन तेंडुलकर आणि संगीतकार प्रविण कुवर यांच्या करीता गायलो हा माझा सन्मान समजतो."


  साईश्री क्रियेशनची निर्मिती असणारा आगामी चित्रपट अहिल्या -  झूंज एकाकी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटामध्ये अहिल्या या व्यक्तीरेखेच्या अवतीभवती चित्रपटाची कथा गुंफली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचे संगीत संगीतकार प्रविण कुवर यांचे असून वैशाली माडे, केतकी माटेगांवकर, रोहीत राऊत यांचे पार्श्वगायन आहे. तसेच नितीन रमेश तेंडुलकर व राजेश बामुगडे यांनी गीते लिहिलीत.

नुकतेच सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी चित्रपटासाठी मुख्य गीत गायिले. "तु चल " हे प्रेरणादायी गीत असुन सकारात्मक उर्जा देणारे आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणालेत की हे गीत आम्हाला शंकर महादेवन यांच्या कडूनच गाऊन घ्यायचे होते त्यामूळे त्यांच्या तारखेकरीता आम्ही तब्बल चार महीने वाट बघितली आणि ज्या प्रकारे गाणे रेकॉर्ड झाले ते ऐकून आमच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले."

"घेवून हाती ही मशाल क्रांतीची जग बदलण्या तू चल..." या प्रेरणादायी गीताचे गीतकार नितीन रमेश तेंडूलकर सांगतात की "या चित्रपटाच्या माध्यमातून नारी शक्तीला दाखविण्यात आले आहे. हे गीत एक सकारात्मक दृष्टिकोन देणारे असून ते तश्या प्रकारे शब्दबद्ध केले आहे."


 या चित्रपटाचे संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीतावर खूप मेहनत घेतली असून सर्वच गाणी यशस्वी ठरतील. स्वताः शंकर महादेवन यांनी गाण्याचे शब्द व संगीताची खूप स्तुती केली ते बोललेत " माझं सौभाग्य आहे की मला हे गीत गाण्याची संधी मिळाली.जो चित्रपट सर्वांना प्रेरणा देणारा आहे आणि हे गीत सुद्धा हे सकारात्मक उर्जा देईल.


यामध्ये प्रितम कागणे अहिल्येचा भूमिकेत असून रोहीत सावंत उदयोन्मुख कलाकार नायकाच्या भूमिकेत येतोय सोबत प्रिया बेर्डे, प्रमोद पवार, नुतन जयंत, निशा परूळेकर, मिलिंद ओक, अमोल कागणे, संध्या माणिक, दिव्या शिंदे, सौरभ पौंक्षे, सुभाष शिंदे यांच्या भुमिका आहेत. या चित्रपटाची कथा राजू पार्सेकर यांची असून पटकथा - संवाद तेजस तुंगार व राजू पार्सेकर यांचे आहेत. छायाचित्रण - विनायक जाधव, ध्वनीमुद्रण - अनिल निकम, संकलन - आंबेडकर सिंग, नृत्य दिग्दर्शन प्रदिप कालेकर, तांत्रिक सल्लागार सुभाष शिंदे यांनी चित्रपटासाठी आपली जबाबदारी निभावली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget