15 ऑगस्टनिमित्त लोकांमध्ये उत्साह

15 ऑगस्टनिमित्त लोकांमध्ये खरेदीसाठी उत्साह मुंबईचा बाजारातून दिसत आहे आणि ऑनलाईन खरेदी केंद्रावर मोठया प्रमाणात खरेदीवर सूट आहे.

साक्षी तावडे(प्रतिनिधी)
15 ऑगस्ट आपला स्वतंत्रदिन ,या  दिवशी आपला देश ब्रिटिशांपासुन स्वतंत्र झाला.याला 71 वर्ष लोटत आहेत.देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक वर्षाच्या 15 ऑगस्ट या दिवशी अख्खा देश स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतो. वयोवृद्धांपासून ते लहानग्यापर्यंत आपल्या परीने तो दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. स्वतंत्र दिवस अधिक उत्साही कसा होईल आणि तो केवळ उत्साहीचं नाही , तर आपल्या देशाप्रती आपलं प्रेम कसं व्यक्त होईल,हेही तितकचं लक्षात ठेऊन.स्वतंत्र दिवसाचा निमित्त प्रत्येक जण काही ना काही तरी, वेगळं करु पहातो मग, त्यामध्ये तरुण आणि वृध्दांपर्यंत सगळ्यामध्ये खुपचं जल्लोष पाहायला मिळतो. आणि याच उत्साहाला अधीक रंजक बनवण्यासाठी बाजारात ,या ऑगस्ट महिन्यात नवीन आकर्षक गोष्टी येत असतात. आणि म्हणूनच त्या गोष्टी आपल्याकडे असाव्या यासाठी  सगळे बाजाराकडे धाव घेताना दिसतात. पालकांना देखील अगदी नूकत्याच जन्मलेल्या बाळासाठी तिरंगा असलेले कपडे , टोपी , हातात घातले जाणारे बॅन्डस अशा कीती तरी गोष्टी घेऊन आपल्या लहानग्या मुलांना नटवायचं असतं आणि केवळ इतकंच नाही, तर तरुणांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येतो तर तो कसा? तर काॅलेजेस मध्ये गायन ,वाद्य तसेच नृत्य, नाट्य इत्यादीच्या  तालिमेसाठी ऑगस्टमध्ये दिवसेदिवस अगदी जीव ओतून काम करणं चालेलं असतं .आणि त्याच बरोबर त्याचं त्यांच्या फॅशनकडे देखील अगदी बारीक लक्ष असतं .मुलांमध्ये देखील टी- शर्टस , शर्टस अगदी रुमाला पासून खरेदी साठी तरुण मंडळी बाजाराकडे वळते .तसेच मुंलीमध्ये देखील लोंग कुर्ता , स्कार्फ, टि-शर्टस आणि बॅग मध्ये देखील वरायटी पण त्यामध्येही तिरंगा चे रंग आणि नक्षीदार अश्या बॅग मुली घेताना दिसतायेत . ऑनलाईन खरेदी केंद्रावरही भरभरुन टक्क्यांची सूट आपल्याला स्वतंत्रदिवसनिमित्त पहायला मिळतेचं आहे या फॅशनच्या वाहत्या वार्‍याला पकडण्यासाठीचं  बाजारात दुकानदारांमध्ये चांगलीच शर्यत दिसून येते, त्यामूळेचं पुर्ण बाजारात स्वातंत्र दिवसाचा वस्तूंचे मोठे प्रमाण दिसते जणू बाजारात ही स्वातंत्रमय झाल्यासारखा दिसून येतो .या मध्ये दादर,कुर्ला,ठाणे,या सारख्या इतर मार्केटस मध्ये दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी हा स्वतंत्र दिवसासाठी उत्साहाने लोक भरभरुन खरेदी करताना दिसत आहेत.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget