पाली एसटी डेपो बनलेय समस्यांचे आगार

पाली एसटी डेपो खड्ड्याचे व घाणीचे साम्राज्य 

सुधागड /पाली
सुधागड तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर तीर्थक्षेत्र संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. येथे जगाच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र येथील एसटी स्थानक समस्यांचे आगार बनले असून स्थानकाची इमारत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बस स्थानकाची इमारत 1977 साली बांधण्यात आली, त्यानंतर आजतगायत म्हणजे 39 वर्षे या इमारती वर कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.

यामुळे इमारत अक्षरश: मोडकळीस आलेली आहे. इमारत केव्हाही कोसळून दुर्घटना होण्याची दाट शक्याता आहे. या स्थानकात सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यातील प्रवासी प्रवास करत असतात. तसेच तालुक्याचे पाली हे मुख्य ठिकाण असल्याने व पालीमध्ये एकमेव महाविद्यालय असल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांनादेखील स्थानकात एसटीची वाट पाहत थांबावे लागत असल्याने स्थानकात विद्यार्थ्यांची, प्रवाशांची रेलचेल असते. अशावेळेस जर इमारत कोसळली तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते. यापूर्वीही इमारतीचा स्लॅब काही वेळा कोसळला होता.

स्थानकातील स्वच्छतागृहाची दूरवस्था
पाली एसटी स्थानकात स्वच्छतागृहाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून याठिकाणी शौचास गेले असता स्लॅब गळत असल्यामुळे व दुर्गंधी तसेच घाणीचे सामराज्य असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

पाली एसटी स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बेशार्मिची झाडे वाढल्याने तसेच ठिकठिकाणी प्लास्टिक घनकचरा असल्याने आगारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानकासमोर पडलेले भलेमोठे खड्डे व त्यात साचलेले पाणी जागोजागी दिसते.
या सर्व समस्यांकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे निर्दशनास येत असून या गंभीर प्रश्नाची परिवहन खाते केव्हा दखल घेणार की, इमारत कोसळून एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का? अशी संतप्त प्रतिक्रीया प्रवासीवर्गातून व्यक्त केली जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget