आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०१७-१८ च्‍या शिक्षकांची नावे जाहिर


आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन  २०१७-१८ च्‍या शिक्षकांची नावे जाहिर
   मुंबई  ( प्रतिनिधी ) –  भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा  ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस,  .त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून ,या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते.  आदर्श शिक्षक महापौर पुरस्‍कार सन २०१७- १८ च्‍या पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षकांची नावे मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज मंगळवारी दुपारी पालिका मुख्‍यालयात आयोजित एका प‍त्रकार परिषदेत जाहिर केली.
   याप्रसंगी उप महापौर श्रीम.हेमांगी वरळीकर,  सभागृह नेते श्रीम.विशाखा राऊत,  स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव,  शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर,  उप आयुक्‍त (शिक्षण) मिलीन सावंत,  शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच सबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते शिक्षण विभागातील पालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत,त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन-१९७१ पासून ०२ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली.तदनंतर वेळोवेळी यामध्येबदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने ”  गौरविण्यात येते.पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत असिधाराव्रत स्विकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी रु.१०,०००/- ,बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक , शाल व श्रीफळ देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.दिनांक - ११ , १३  व १६ ऑगस्ट..२०१८ या कालावधीत निवड समितीने सिटी ऑफ लॉस एंजालिस मनपा शाळा,माटुंगा ( पश्चिम  ) येथे १०८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सन- २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण – १०८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget