मुंबईतील उद्यानात आढळला ७ फूट अजगर

 मुंबईतील उद्यानात आढळला  ७ फूट अजगर

प्रतिनिधी मुंबई
मुंबई: कलानगर आणि माहीमच्या मध्यभागी येणाऱ्या नंदादीप गार्डन भागातील वांद्रे ब्रिजवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ७ फूट लांबीचा अजगर आढळून आला. परिसरातील रहिवाशांनी हा अजगर बघितल्यावर तातडीनं सर्पमित्रांना संपर्क केला. त्यानंतर, सर्पमित्रांनी या अजगरला ताब्यात घेतलं. मात्र, अजगर पकडताना बघ्यांची चांगलीच गर्दी झाल्याने या भागात काही काळ वाहतूककोंडी झाली होती.

इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) जातीचा हा अजगर ७ फूट लांबीचा होता. सर्पमित्रांनी या अजगराला पकडून ठाण्यातील वनविभागाच्या ताब्यात दिलं. मुंबईत मानवी वस्तीमध्ये वन्यजीव शिरण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या महिन्यात ३ ते ४ अजगर वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) इथं आढळल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.

मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे आणि मेट्रोच्या कामामुळे जमिनीला हादरे बसत आहेत. यामुळे अजगरांची घरं नष्ट होत असल्याने हे वन्यजीव शहरी वस्तीत येत आहेत. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget