देशात प्रथमच वापरात येणार 'साईड लोडिंग' कॉम्पॅक्टर ओला कचरा, सुका कचरा आणि इ-कच-यासाठी स्वतंत्र कॉम्पॅक्टर


देशात प्रथमच वापरात येणार 'साईड लोडिंग' कॉम्पॅक्टर
ओला कचरा, सुका कचरा आणि इ-कच-यासाठी स्वतंत्र कॉम्पॅक्टर

नकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागात 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर'

 मुंबई ( प्रतिनिधी ) –  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे, यादृष्टीने घनकच-याची वाहतूक करण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक स्वरुपाच्या 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर'च्या सेवा कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेतल्या जाणार आहेत. 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर' मध्ये गाडीच्या डाव्याबाजून कचरा डबा उचलण्याची सुविधा असल्याने या गाड्या वाहतूकीच्या दृष्टीने अधिक सुविधाजनक असणार आहेत. तसेच याबद्दल उपलब्ध माहितीनुसार 'साईड लोडिंग' पद्धतीचे कॉम्पॅक्टर्स हे देशात प्रथमच वापरात येणार असून प्रत्येक विभागात दोन ते चार कॉम्पॅक्टर्स हे 'साईड लोडिंग' पद्धतीचे असणार आहेत.
या 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर'सह ६४५ कॉम्पॅक्टर्सची सेवा भाड्याने घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये ३९९ मोठे कॉम्पॅक्टर्स व २४६ लहान कॉम्पॅक्टर्सचा समावेश आहे. या सर्व कॉम्पॅक्टर्स मध्ये 'जीपीएस', 'आरएफआयडी रिडर' या अत्याधुनिक सुविधांसहसह ओला कचरा, सुका कचरा व ई-कचरा यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा असल्याने कचरा एकमेकात मिसळणार नाही, याची दक्षता आपोआपच घेतली जाणार आहे. हे कॉम्पॅक्टर्स सर्व २४ विभागात टप्प्याटप्प्याने वापरात येणार आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनानुसार या कॉम्पॅक्टर्सच्या वापराचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget