माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाबद्दल महापौरांकडून श्रध्‍दाजंली


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाबद्दल
महापौरांकडून श्रध्‍दाजंली
    मुंबई  ( प्रतिनिधी ) –   देशाच्‍या राजकारणातील ऋषीतुल्‍य असे व्‍यक्तिमत्‍व तसेच भारतीय संसदीय राजकारणातील पितामह,  अमोघ वक्‍तृत्‍वाचे धनी, संवेदशनशील कवी आणि भारताचे माजी पंतप्रधान ‘ भारतरत्‍न’  अटलबिहारी वाजपेयी यांचे आज गुरुवारी  दिल्‍लीतील एम्‍स रुग्‍णालयात वृध्‍दापकाळानं निधन झाल्‍याने मुंबईचे प्रथम नागरिक तथा महापौर म्‍हणून मी  विश्‍वनाथ महाडेश्‍वर समस्त मुंबईवासियांच्‍या वतीने त्‍यांना श्रध्‍दाजंली अर्पण करीत आहे.
शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांच्‍या अनेक बैठका व गाठीभेटी महापौर निवास येथे झाल्‍या.महापौर निवास हया घटनांचा साक्षीदार आहे. त्‍यांचे निधन झाल्‍याचे समजताच खुप दुःख झाले . सेना- भाजप युती टिकविण्‍यामध्‍ये  वाजपेयीजींचा सिंहाचा वाटा होता आणि त्‍यांनी नेहमीच युतीच्‍या मदतीचा हात शिवसेना प्रमुखांस दिला.समस्‍त मुंबईकर त्‍यांच्‍या कुटुंबियांच्‍या दुःखात सहभागी असून एका युगाचा अस्‍त झाला असून मुंबईच्‍या सर्व नागरिकांच्‍या वतीने मी मुंबईचा प्रथम नागरिक म्‍हणून अटलबिहारी वाजपेयीजी यांना भावपूर्ण श्रध्‍दांजली वाहतो.
त्‍यांच्‍या आत्‍म्‍यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget