म्हसळयात सकल मराठा समाजातर्फे शांततेत आंदोलन ; मोर्चा काढून तहसीलदारांना दिले निवेदन

म्हसळयात सकल मराठा समाजातर्फे शांततेत आंदोलन ; मोर्चा काढून तहसीलदारांना दिले निवेदन

म्हसळा प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढून बंद चे आव्हान मराठा समाजाने केले होते.त्या अनुशंघाने म्हसळा तालुक्यातील सकल मराठा समाजाने प्रथम ज्यानी आरक्षण मिळावे म्हणून बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहिली आणी त्यांनतर  कुठल्याही प्रकारचे बंद न ठेवता म्हसळा एसटी स्टँड पासून तहसील कार्यालय पर्यंत शांततेत मोर्चा काढून तहसीलदार रामदास झळके यांचा मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.जर राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिले नाहीतर या पुढचे आंदोलन हे उग्र स्वरूपाचे असेल त्यामुळे जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला शासन जबाबदार असेल असे निवेदनात नमूद केले आहे.यावेळी नंदू शिर्के आणी व्यकंटेश सावंत यांनी जमलेल्या मराठा समाजाला मार्गदर्शन केले. सदर मोर्चाला रवी दळवी, मुरलीधर महामुनकर, जयवंत सावंत, संतोष सावंत, अमित महामुनकर, वैशाली सावंत, अनिल महामुनकर,राजेंद्र सावंत, किरण पालांडे,  मंगेश शिर्के,सचिन महामुनकर, उपस्थित होते. या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हसळा पोलीस स्टेशन मार्फत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. म्हसळा तालुक्यात शाळा आणी एसटी बस सोडून सर्व व्यवहार सुरळीत चालू होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget