जीवनस्तर निर्देशांकात मुंबई हे देशातील सर्वेात्तम महानगर देशातील शहरांच्या सर्वेक्षणात बृहन्मुंबईचा तिसरा क्रमांक

जीवनस्तर निर्देशांकात मुंबई हे देशातील सर्वेात्तम महानगर
देशातील शहरांच्या सर्वेक्षणात बृहन्मुंबईचा तिसरा क्रमांक

केंद्र सरकारद्वारे देशातील शहरांचे जीवनस्तर निर्देशांक जाहीर


   मुंबई ( प्रतिनिधी ) –   केंद्र सरकारच्या 'आवासन आणि शहरी कार्य मंत्रालय' यांच्याद्वारे देशभरात प्रथमच जीवनस्तर निर्देशांक निर्धारित करण्यासाठी संपूर्ण देशभरातील १११ शहरांशी संबंधित विविध बाबींचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले होते. याबाबत केंद्र सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या आकड्यांनी मुंबईकरांच्या अभिमानात भरच पडली आहे. या आकडेवारीनुसार 'जीवनस्तर निर्देशांक २०१८' अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात बृहन्मुंबई हे देशातील ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणा-या महानगरांमध्ये सर्वेात्तम महानगर ठरले असून सर्व १११ शहरांमध्ये बृहन्मुंबई पालिका क्षेत्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मुंबईकरांना विविध सेवा सर्वेात्तम पद्धतीने देण्यासाठी पालिका दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजनाद्वारे सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही याच समर्पित भावनेने महापालिका कार्यरत राहील. हा सन्मान मुंबईकरांचा आणि बृहन्मुंबई पालिकेचा गौरव आहे, अशी भावना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे 'जीवनस्तर निर्देशांक २०१८'निर्धारित करण्यासाठी देशभरातील शहरांमधील विविध बाबींचा सर्वस्तरीय व सर्वंकष अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शहरातील संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक व भौतिक बाबींशी संबंधित १५ बाबींचा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण  खुल्या जागा, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबींचा समावेश होता. त्याचबरोबर या बाबींशी संबंधित विविध ७८ बाबी वा घटकांचाही अभ्यास या निर्देशांक निर्धारणात करण्यात आला होता, अशी माहिती या निमित्ताने प्रकाशित अहवालामध्ये देण्यात आली आहे जीवनस्तर निर्देशांकामध्ये देशातील सर्व महानगरांमध्ये सर्वोत्तम क्रमवारी मिळवणा-या मुंबईने देशातील १११ शहरांच्या सकल क्रमवारीत बृहन्मुंबई महानगराला तिसरा क्रमांकांने गौरवान्वित करण्यात आले आहे. याबाबत प्रकाशित झालेल्या अहवालातील नमूद केल्यानुसार पायाभूत सुविधा हा कुठल्याही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. या वर्गवारीत सर्वेात्तम कामगिरी असल्याची नोंद या सर्वेक्षणात घेण्यात आली असून यात पाणीपुरवठा, खुल्या जागा, गृहनिर्माण, उपलब्ध जागांचा प्रभावी वापर, वाहतूक, विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदुषण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच मा. पंतप्रधानांच्या हस्ते बृहन्मुंबई पालिकेला 'स्वच्छता सर्वेक्षण २०१८' या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत राज्यांच्या राजधान्यांच्या गटात देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. त्यानंतर आज 'जीवनस्तर निर्देशांक २०१८' अंतर्गत देखील बृहन्मुंबई पालिकेने आपला अग्रक्रम अबाधित राखल्याने महाराष्ट्राच्या राजधानीच्या गौरवात भरच पडली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget