पालिका आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून पालिका सभागृहात पडसाद

पालिका आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून
पालिका सभागृहात पडसाद


मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागात सतत कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून पालिका सभागृहात आज सोमवारी चांगलेच पडसाद उमटले विरोधी पक्षाने  सत्ताधारी शिवसेनेला आणि पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले  मात्र पालिका प्रशासनाने प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे सांगत सर्वच राजकीय पक्षांची बोलती बंद केली

  गेल्या अनेक वर्षापासून पालिका आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३ ऑगस्टपासून आझाद मैदानात सुरु केलेल्या धरणे आंदोलनानंतर सवॅच राजकीय पक्षांनी आता श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सदर प्रश्नी पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर थेट मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आयुक्तांना आरोग्य सेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदेश मिळाल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोमवारी पालिका सभागृहात यावरून जोरदार चर्चा रंगली. शिवसेनेने हा मुद्दा प्रथम आम्ही उपस्थित केल्याचा दावा केला. तर विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी आरोग्य सेविकांना दिलेल्या आश्वासनांनुसार सदर विषय सभागृहात निवेदनाद्वारे चर्चेला आणण्याचे सांगितले. राष्ट्रवादीकडून आम्ही हा मुद्दा आरोग्य समितीत प्रथम उपस्थित केला असे सांगत मात्र त्यावेळी प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याचा आरोप केला. प्रत्येक राजकीय पक्ष आरोग्य सेविकांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करीत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. मात्र पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले
आरोग्य सेविकांच्या काही मागण्यांबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे. याचा अर्थ प्रशासन आरोग्य सेविकांच्या बाजूने संवेदनशील नाही असा आरोप करीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाने सदर याचिका मागे घ्यावी, अशी मागणी केली.शिवसेनेने आरोग्य सेविकांच्या मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे , शिवसेना त्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असल्याने हा प्रश्न धसास लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली. यावर भाजपचे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी आरोग्य सेविकांच्या मागण्यांबाबत भाजप संवेदनशील असल्याने आमच्या नेत्याने मंत्रालयात जाऊन प्रयत्न केला. चार हजार आरोग्यसेविका भगिनी निर्णयाची वाट पाहत आहे. सत्ताधारी शिवसेनेने करून न दाखविल्याने आम्हाला ते करावे लागले, असा टोला शिवसेनेला लगावला. राष्ट्रवादीने आरोग्य समितीत सदर प्रश्नावर प्रथम वाचा फोडली. मात्र त्यावेळी प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य करता येणार नाही असे सांगितले. तसेच पालिकेच्या प्रत्येक विषयाद्वारे मुख्यमंत्री लक्ष देत असतील तर पालिकेचे कामकाज कसे चालणार, असा सवाल राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget