गटारी स्पेशल मालवणी कोळंबी मसाला कसा बनवावा? शेफ अनिकेत टेंबे सोबत

     गटारीनिम्मित किंवा एरवी नॉन व्हेज खवय्यांसाठी
मालवणी कोळंबी मसाला कसा बनवावा हे कसे बनवतात ते पहा.


गटारी म्हटलं की आठवत नुसतं नॉन व्हेज आणि मद्य. एका महिन्यांसाठी पोटात जाणार नॉनव्हेज आणि मद्य बंद कारण श्रावण महिन्यात काही लोकं ते खाणं-पिणं टाळतात.त्यामुळे हा महिना सुरू होण्याच्या आधी लोकं गटारी अगदी उत्साहाने करताना दिसतात.त्यामध्ये पावसाळी जी लास्टची कोळंबी समुद्र दऱ्यांमध्ये असते ती लोकं गटारीचा निमित्ताने खायला उत्सुक असतात.म्हणून या निमित्ताने मालवणी कोलंबी मसाला काय आहे ? आणि तो कस बनवतात ?ते आपण शेफ अनिकेत टेंबे  यांच्याकडून कृती आणि साहित्यासह घेतलं आहे

मालवणी कोलंबी मासालासाठी लागणारे  साहित्य
-  कोळंबी - २ कप किंवा साधारण २०-२५ नग डोकी आणि काळा दोर काढून स्वच्छ केलेली.
- कांदे २-३ मध्यम आकाराचे बारीक चिरून
-  टोमॅटो २ मध्यम आकाराचे बारिक चिरून
- बटाटा १ मध्यम आकाराचा फोडि करून
- ओले खोबरे अर्धी वाटी (खउन) किंवा सुके खोबरे पावडर
आले लसूण पेस्ट १ टेबल्स्पून
कोकम/ आमसोलं २/३
- लाल तिखट १ टेबल स्पून
-  हळद १/२ टीस्पून
-  गरम मसाला १ टेबल स्पून
-  मालवणी मसाला १ टेबल स्पून
-  मीठ चवीप्रमाणे
-  तेल

 मालवणी कोलंबी मसाला करण्यासाठीची कृती
  मॅरिनेशन :कोळंबी स्वच्छ धुवुन त्याला हळद, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि चविप्रमाणे मिठ लावुन बाजूला ठेउन द्यावी.
-एका पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यावर बारिक चिरलेला कांदा घालावा.कांदा गुलाबीसर परतत आला की त्यावर किंचित हळद टाकून मग खोवलेले खोबरे आणि बारिक चिरलेला टोमेटो टाकून परतावे. बटाट्याच्या फोडी घालाव्यात. एक वाफ काढावी.मिश्रण थोडे परतल्यावर मग गरम मसाला आणि मालवणी मसाला घालून मंद आचे वर चांगले तेल सुटे पर्यंत परतावे.त्यावर मिठ मसाला लावलेली कोळंबी घालून एक वाफ काढावी. थोडाफार रस्सा हवा असल्यास कपभर पाणी घालून कोळंबी शिजवुन घ्यावी. फार ढवळू नये कोळंबी मोडण्याची शक्यता असते. पण मसाला खाली लागता कामा नये. नंतर आवडीप्रमाणे आमसुले टाकावित. बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. यानंतर थोड्यावेळातच मालवणी कोलंबी मसाला तयार.झाली ना गटारी स्पेशल चाखण्याची आणि जेवनांच्या उत्तम डिशची सोय.
      अशाच नवीन नवीन प्रकारचा डिश आपण पाहणार आहोत उत्तम शेफ बरोबर ,प्रत्येक सणासुदीला ,त्यासाठी जोडून रहा मुंबई वार्ता वेब न्युज पोर्टलला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget