गणपती मंडपाच्या परवानगीसाठी २ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ – महापौर


मुंबई  ( प्रतिनिधी ) – बृहन्मुंबई पालिका क्षेत्रातील गणपती मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २ सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली असून महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही गणेशमंडळ राहता कामा नये यासाठी मंडळांनी आपली कागदपत्रे संबंधीत विभाग कार्यालयात सादर करुन मंडपासाठीची रितसर परवानगी पालिकेकडून प्राप्ती करुन घ्यावी,  असे आवाहन   मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज बुधवारी दुपारी पालिका अधिकाऱयांसमवेत पालिका मुख्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत केले.
याप्रसंगी शिवसेना नेते लिलाधर डाके, नगरसेवक रमेश कोरगावंकर,  मुंबई उपनगरे गणेश उत्सव समन्वय समितीचे सचिव व माजी आमदार विनोद घोसाळकर,  उप आयुक्त  (परिमंडळ - २) नरेंद्र बरडे  तसेच संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते.प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर  म्हणाले यावर्षी २६९४ विक्रमी अर्ज आले असून त्यापैकी एकाच मंडळाचे अनेक अर्ज इत्यादी कारणामुळे ५९४ अर्ज रद्द केले आहेत. राहि‍लेल्या २१०० अर्जांपैकी एकूण १४२५ परवानग्या (६७ टक्के) देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका व पोलिसांच्या छाननीमध्ये २२३ अर्ज (१० टक्‍के) नाकारण्यात आले आहेत. तसेच उरलेल्या ४५२ (२३ टक्के) अर्जांवर पुढील दोन दिवसात महापालिका प्रशासन योग्य तो  निर्णय घेऊन मंडप परवानगी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यात येईल,  असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget