महाड तालुक्यातील तेलंगे आदिवासीवाडी योयी-सुविधांपासून वंचित

महाड तालुक्यातील तेलंगे आदिवासीवाडी योयी-सुविधांपासून वंचित

महाड :
महाड तालुक्यातील तेलंगे आदिवासीवाडीमध्ये विज पोहचली आहे, परंतु केवळ दोनच घरांमध्ये, शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु काही वर्षात घरकुले जमीदोस्त झाले आहेत. पाण्याची पाईप
लाईन पोचली आहे, परंतू कित्येक वेळेस डोईवर हांडा घेवून टाकीत साठवणूक केलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा लागतो. तेलंगे आदिवासीवाडीची व्यथा फार दाहक असून या वाडीवर जाण्यासाठी पक्का यस्ता तर नाहीच तसेच विजेचे कनेक्शन येथे शासनाने पोचवले परंतू पाडयावर एकूण १६ घरांची वस्ती असून जेमतेम ५० लोकसंख्या असून केवळ दोनच झोपड़ी वजा घरांमध्ये विजेचे मीटर पोचले आहे. तर इतर १४ घरांमध्ये आपल्या देशाच्या स्वतंत्रच्या ७० वर्षांनंतर देखील आज रॉकेलचे दिवे लावून संसार हाकण्याचे येथील आदिवासी भगिनी परिश्रम घेत आहेत. त्यांनी सांगितले
की आम्ही महावितरणच्या कार्यालयांमध्ये जावून वीजेचे मीटर मिळावे यासाठी धावपळ केली परंतू आमच्या हाकेला कोणीच दाद दिली नाही. येथील शिक्षण घेत असलेली मुले इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत तेलंगे रा.जि.प.
मराठी शाळेत तर पुढे दहावी पर्यंत चिंभावे हायस्कूल येथे शिक्षण घेण्यासाठी पायीच पायपिट करावी लागत आहे. तेलंगे बौध्दवाडी येथे दुचाकी ठेवून डोंगर पायवाटेने थेट ५०० मीटर पायपीट करून आदिवासी पाडयावर पोहचता येते. तोही माती दगडाचा बनलेली पायवाट आहे. असा सारा जीवन परिपाट असला तरी शसनाच्या हगणदारी मुक्त योजनेचा मात्र येथे बोजवारा उडालेला दिसत नसून प्रत्येक झोपड़यामागे स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून शौचालय बांधलेले आहे. आज शासन आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांतोपरी प्रयत्न करत आहे, परंतू शासकिय
योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचत नाही. शासनाचा दुआ जरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असले तरी विकासात्मक योजनांना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न अशा पध्दतीने निष्फळ ठरत
असल्याचे दिसत आहेत. या आदिवासी बांधवांची करूण व्यथा प्रत्यक्षात पाहून व जाणून खरोखरच असे म्हणावेसे वाटते की, धरतीचे पांघरूण घालून अंगावर आकाशाची वाकल घेवून यांचा उघडयावरचा संसार हेच यांचे जीने आहे का ? यालाच जीवन म्हणायचे का ?

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget