बाळ संगोपनासाठी पालिका देणार 730 दिवस रजा


बाळ संगोपनासाठी पालिका देणार 730 दिवस रजा

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  राज्य सरकारच्या धर्तीवर महानगरपालिका कमॅचा-यांना आपल्या विकलांग अपत्याच्या संगोपनासाठी संपूर्ण सेवेत 730 दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा आता मिळणार आहे तशी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी केली आहे येत्या पालिका सभागृहात ही ठरावाची सूचना मंजुरीसाठी येणार आहे
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे मात्र या मुंबापुरीत मोठ्या प्रमाणात वाढती महागाई असून राहणीमान सुधारण्यासाठी कुटुंबातील पुरुष॔ बरोबर महिलांनाही नोकरी निमित्त 7 ते 8 तास घराबाहेर रहावे लागते अशात महिला कमॅचा-यांचे अपत्य विकलांग जन्माला आल्यास सदर महिलेला सवॅसाधारण बाळाच्या तुलनेत आपला जास्तीत जास्त वेळ विकलांग मुलांच्या संगोपनासाठी वेळ देणे आवश्यक असते तसेच विकलांग मुलांच्या शारिरीक आणि बौद्धिक विकासाचा वेग खुपच कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करण्याकरिता वारंवार वैद्यकीय सल्ल्यांची , उपचारांची आवश्यक ता असते अतएवं नोकरी संभाळून विकलांग अपत्याचे संगोपन करणे सदर मातेस जिकरीचे होत असते तसेच महानगरपालिकेच्या महिला कमॅचा-यास आणि पत्नी नसलेल्या पालिकेच्या पुरुष कमॅचा-यास म्हणजेच अशा अपत्याच्या वडिलांना देखील विकलांग अपत्य थोडे मोठे होईपर्यंत वारंवार रजा घेणे शक्य नसते अशा कमॅचा-यांच्या अनुपस्थितीचा मानवतावादी दृष्टीकोनातून सहानुभूती पूवॅक विचार करणे आवश्यक आहे ही वर-तुरि-थती लक्षात घेता राज्य शासनाच्या धतीॅवर पालिका कमॅचा-यांना आपल्या विकलांग अपत्याच्या संगोपनासाठी संपूर्ण सेवेत 730 दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी अशी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी केली आता ही ठरावाची सूचना येत्या पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार या ठरावाच्या सुचनेला पालिका सभागृहाची मंजुरी मिळेल असा विश्वास नगरसेविका पाटेकर यांनी व्यक्त केला आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget