बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच मिळणार 500 स्क्वेअर फुटाचे घर

बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच मिळणार 500 स्क्वेअर फुटाचे घर

   मुंबई ( प्रतिनिधी ) – गेल्या अनेक वर्षापासून त्रस्त असलेल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारच्या नवीन धोरणांच्या निकषानुसार बीडीडी चाळीतील रहिवाशांना  त्यांच्या मालकी हक्काच पाचशे स्क्वेअर फुटाचे घर  मिळणार अशी माहिती अखिल बीडीडी चाळ भाडेकरू संरक्षण समितीचे सरचिटणीस  किरण माने यांनी दिली. 
        सर्व संघटना आपापल्या परीने बीडीडी पुनर्विकासात आपला सहभाग नोंदवत आहेत सध्या सरकार मार्फत देण्यात येणारी मालकी हक्काचे पाचशे स्क्वेअर फुट घरांसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत एकदा मी नवीन घरात कधी राहतो याची उत्सुकता लागून राहिली आहे हे घर दहा वर्षे मेंटनस फ्री असणार आहे व त्यांच्या नंतर दहा वर्षांनी टेलिस्कोपिक पद्धतीने भाडे आकारले जाणार आहे. म्हाडाच्या वतीने रहिवाशांना त्यांची व्यवस्था जवळपास करण्यात आल्यामुळे रहिवाशांच्या दिनचर्येमध्ये कोणताही बदल होणार नाही मग या सुंदर योजनेला विरोध असण्याचे कारण नाही परंतु काही पदाधिकारी रहिवाशांची दिशाभूल करीत आहेत त्यांचा हा राजकीय डाव असून किंबहुना वरळी नायगाव डिलाईल रोड या परिसरातील प्रायव्हेट विकासक त्यांना विरोध करण्यास भाग पाडत आहेत , असा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे कारण नवीन पुनर्विकासात निर्माण होणाऱ्या घरांमुळे प्रायव्हेट विकासाच्या घरांच्या विक्रीवर परिणाम होणार आहे त्यामुळे या पुनर्विकासाला विरोध करण्याचे काम काही लोक करत आहेत असेही किरण माने यांनी सांगितले. पुनर्विकासाचा कालावधी सात ते नऊ वर्षे असा ग्राह्य धरण्यात आलेला आहे छोटे-छोटे निर्माण होणारे प्रश्न सरकारसोबत वाटाघाटी करून सोडवले जाऊ शकतात परंतु टोकाचा विरोध करून सध्याचे राहते घर 180 स्क्वेअर फुटाचे ऐवजी पाचशे  स्क्वेअर फुटाचे मालकी हक्काचे घर मिळणार आहे , असे किरण माने यांनी सांगितले  झोपडपट्टीधारकांना सरकारच्या नवीन धोरणानुसार 2011 पर्यंतच्या निकषानुसार पुनर्विकासात समाविष्ट करणे कमर्शियल गाळेधारकांना योग्य एफएसआय मिळावा आणि त्यांच्या पुनर्वसनानंतर त्यांच्या उद्योगावर कुऱ्हाड कोसळणार नाही याची दखल संघटना घेणार ,  अनधिकृत स्टॉलधारकांना सरकारने 2011 पर्यंत निकषाप्रमाणे समाविष्ट करण्यात यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे तसेच बीडीडी चाळ परिसरात असणाऱ्या पोलीस वसाहत येथील पोलीस बांधव तसेच महानगरपालिका कर्मचारी त्यांना कायमस्वरूपी घरे मिळावीत , अशी आमची आग्रही मागणी असल्याचे किरण माने यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget