500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा चौकशी अहवाल येत्या 8 दिवसांत सादर करणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा चौकशी अहवाल येत्या 8 दिवसांत सादर करणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

दोषींवर होणार कठोर कारवाई

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या जोगेश्वरी येथील पाचशे कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचा विषय गेल्या काही दिवसापासुन पालिकेत चांगलाच गाजत आहे आता या घोटाळ्या प्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आता चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे या घोटाळ्याचा चौकशी अहवाल येत्या आठ ते दहा दिवसांत सादर केला जाईल.आणि या चौकशीत दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आज गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त मेहता यांनी दिली.तसेच या प्रकरणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे या अहवालाकडे सवाॅचे लक्ष आहे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत पालिकेचे भुखंड आहेत जोगेश्वरीच्या मजास वाडीतील 13 हजार 674 चौरस फूटांचा आणि तब्बल 500 कोटींचा भूखंड पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन खात्यामधील अधिकाऱ्यांनी अफरातफर करून बिल्डरच्या घशात घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. आयुक्त मेहता यांनी स्थायी समितीत उपस्थित राहून या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले. नियमानुसार हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जमीन मालकाने 2014 मध्ये खरेदी नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीत ही जागा पालिकेने ताब्यात घेणे अपेक्षित होते. मात्र हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे जमीन मालकाने न्यायालयात केलेल्या दाव्यानंतर पालिकेने बाजू मांडण्यास विलंब केल्याने ही जागा पालिकेच्या ताब्यातून गेली असल्याचे सांगून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. यावर आयुक्त मेहता यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत येत्या आठ - ते दहा दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करून तो जाहिर केला जाईल. यांत दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्याविरूध्द  कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे या घोटाळा प्रकरणी अहवालाकडे सवाॅचे लक्ष लागले आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget