500 चौरस फूट आणि 700 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्ता दारांना सवलत द्यावी या मागणीसाठी शिवसेना आमदारानी घेतली पालिका आयुक्तांची भेट

500 चौरस फूट आणि  700 चौरस  फुटापर्यंतच्या मालमत्ता दारांना सवलत द्यावी या मागणीसाठी शिवसेना आमदारानी घेतली पालिका आयुक्तांची भेट

मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकांना  500 चौरस फुटांच्या मालमत्ता करातून सूट आणि 700 चौरस फूटांपर्यंतच्या मालमत्तादारांना सवलत द्यावी, असा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता.मात्र मुंबईकरांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत पालिका प्रशासन  चालढकल करीत आहे या प्रकरणी शिवसेना आता आक्रमक झाली आहे  शिवसेनेच्या आमदारांनी आज सोमवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर मुंबईकरांना दिलासा द्यावा आणि दिवाळी पूर्वी या निणॅयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली
   मुंबईकरांना 500 चौरस फुटांच्या मालमत्ता करातून सूट आणि 700 चौरस फुटा पर्यंतच्या मालमत्ता दारांना सवलत या विषयी आज सोमवारी  शिवसेनेच्या 16 आमदारांच्या सह्यांचे पत्र आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ आणि सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपांवरील कारवाई आदी मुद्द्यांवर आयुक्तांसोबत आमदारांची चर्चा करण्यात आली. विधीमंडळातील मुख्य प्रतोद सूनिल प्रभू आणि आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. मुंबईकरांना मालमत्ता करात सूट आणि सवलत देण्याबाबत 6 जुलै 2017 रोजी सभागृहात ठराव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शिवसेनेने वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, झारीतले शुक्राचार्य हा निर्णय मंजूर होऊ नये, यासाठी कार्यरत आहेत. या झारीतल्या शुक्राचार्याचा डोळा फोडण्याचे काम शिवसेना करेल, असा इशारा शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिला. मेट्रोच्या कामांमुळे मुंबईतील शंभर वर्षापूर्वीच्या गणेश मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारली जात आहे. मुर्तीकारांनाही याचा फटका बसतो आहे. त्यामुळे मंडळांना दिलासा देण्यासाठी सरसकट मंडपांना परवानगी द्यावी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आरोग्य सेविकांचे मानधन पाच हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये करावे, दिवाळीपूर्वी यानिर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी सूचना आयुक्त मेहता यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेना आमदाराकडून देण्यात आली
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget