दमणगंगा, गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प मार्गी लागल्यास मुंबईकरांना पुढील 33 वर्षे पाण्याची चिंता भासणार नाही .


दमणगंगा, गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प मार्गी लागल्यास मुंबईकरांना पुढील 33 वर्षे पाण्याची चिंता भासणार नाही .
मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज पाणी पुरवठा करत आहे या नगरीतील मुंबईची वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण लक्षात घेवून पालिकेचे भविष्यातील दमणगंगा, गारगाई आणि पिंजाळ हे तीन प्रकल्प मार्गी लागल्यास पुढील 33 वषेॅ मुंबईकरांना पाण्याची चिंता भासणार नाही अशी ग्वाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली आहे
मुंबई पालिका मुंबईकरांना दररोज तीन हजार 750 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करत आहे मात्र दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या असल्याने हे पाणी कमी पडत आहे पाण्याची मागणी होत आहे सध्या मुंबईला मोडक सागर, तानसा, तुळशी ,विहार, मध्य वैतरणा,  भातसा या सहा धरणातून पाणी पुरवठा होत आहे या  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा धरण, पिसे बंधारा, पांजरापुर जलशुद्धीकरण प्रकल्प यांचा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी नुकताच आढावा घेतला. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत समाधानकारक पाऊस पडल्याने सर्व धरणे भरलेली आहेत. यामुळे मुंबईकरांना यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र नागरिकांनीही पाणी वापराबाबत आवश्‍यक खबरदारी घ्यायला पाहिजे. मुंबईत सध्या वाढती लोकसंख्या, इमारतींची बांधकामे पाहता मुंबईकरांची वाढती तहान भागविण्यासाठी पालिकेने दमनगंगा, पिंजाळ व गारगाई हे तीन पाणीप्रकल्प हाती घेऊन ते वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. हे पाणी प्रकल्प पूर्ण झाल्यांनंतर 2051 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटेल असा विश्‍वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला. मुंबईकरांना भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पालिका पाण्याचे नवीन प्रकल्प हाती घेत असून ते प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget