आरक्षणासाठी धनगर समाजाचा 29 ऑगस्टला मोर्चा          मुंबई : प्रतिनिधी         
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मराठा,  मातंग आणि दलित मुस्लिम समाज पुढे सरसावला असून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येत्या 29 ऑगस्टला विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भारत अगेन्स करप्शनचे अध्यक्ष श्री हेमंत पाटील यांनी दिली. धनगर समाजाचा समावेश आदिवासीत करण्यात यावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आता  इतर समाजातील लोकही सहभागी होत आहेत.
सदरचा मोर्चा 29 ऑगस्टला प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर ठिकठिकाणी शांततेने आंदोलन  करण्यात येणार आहे हेमंत पाटील व त्या च्या सहकाऱ्यांनी इतर समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणी मोठ्या संख्येने लोक पाठिंबा दर्शवित आहेत विधीमंडळात व संसदेत सरकारकडून प्रयत्न केल्यास नक्कीच धनगर समाजाला आरक्षण मिळेल असे पाटील यांनी सांगितले. परंतु भाजपा सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यास वेळोवेळी टाळत आहेत त्यामुळे हा  एल्गार मोर्चा आम्ही काढलेला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget