27 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन


27 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन

प्
 मुंबई:-      आज मुंबई प्रेस क्लब येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेमागच उद्दिष्ट असं होतं की, येत्या 7 ऑगस्टला ओबीसी महासंघाचे 3 तिसरे अधिवेशन आयोजित केले आहे. तर या आधी ही अगोदरचा 2 अधिवेशनात महासंघाचा एकदोन मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत परंतु त्या धिम्या गतीने पूर्ण करत आहे असे संघाचे मत आहे. त्या मागण्या जलद गतीने पूर्ण व्हाव्या यासाठी आणि त्यांचा प्रमुख अजून मागण्या आहे. त्या पूर्ण झालेल्या नसून बाकीच्या मागण्यासाठी येत्या 7 ऑगस्टला अधिवेशनात आयोजित केले आहे ,असे ओबीसी महासंघाचे संयोजक डॉ. बबनराव तायवाडेयांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच परिषदेत उपस्थित ओबीसी महासंघ सचिव सचिन राजूरकर व पदाधिकारी व सहकारी मतीन खान,सलीम अलवार,वझील काधिर, सलीम नगाणी,अमित साळुंखे यांनी अधिवेशनाला देशातील सर्व ओबीसी बंधु-बघिणी उपस्थित राहुन अधिवेशन यशस्वी करुया अशी विनंती केली आहे.
या अधिवेशनात समाजाच्या  काही मागण्या आहेत
1) राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा.
2)ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे
3)ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांना सयूंक्त भारतरत्न द्यावा.
4)कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्टगाव योजना लागू करावी.
अशा 24 मागण्या ते येत्या अधिवेशनात मांडणार आहेत.
        7 ऑगस्ट2018 रोजी होणार हे अधिवेश नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिआ येथील डोम हाजी अली समोर ,वरळी मुबंई येथे होणार आहे .या अधिवेशनाच  उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा हस्ते होणार असून या अधिवेशनात आदि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget