पालिकेच्या 2100 मालमत्ता ताब्यात असूनही नावावर नाही पालिका सुधार समितीत चांगलेच पडसाद

पालिकेच्या 2100 मालमत्ता ताब्यात असूनही नावावर नाही
पालिका सुधार समितीत चांगलेच पडसाद
अनेक विकास कामे ठप्प
मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेच्या चक्क दोन हजार शंभर  मालमत्ता ताब्यात असूनही नावावर नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे या प्रकरणी आज मंगळवारी पालिका सुधार समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरत या जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासन जागा नावावर करण्यास टाळाटाळ करीत असून या कारभारामुळे अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत असा आरोप केला
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे या जनतेला पालिका दररोज मुलभूत सेवा सुविधा पुरवत असून या नगरीत पालिकेचे मोठ्या प्रमाणात भुखंड आहेत मात्र 2100 भुखंड पालिकेच्या नावावर झाले नसल्याची माहिती पालिका उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी आज मंगळवारी पालिका सुधार समितीत दिली त्यामुळे ही बाब उजेडात आली   शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी आनंद नगर येथील एका भुखंडाबाबत सुधार समितीला दिलेल्या पत्रामुळे हा प्रकार चर्चेत आला. हा भुखंड पालिकेच्या ताब्यात येऊनही अद्याप नावावर करण्यात आलेला नाही. यामुळे तीन-चार विकासक येऊनही "म्हाडा' एनओसी देत नसल्यामुळे या ठिकाणचा विकास रखडला आहे. मुंबईतील अशा अनेक प्लॉटचा गैरवापर होत असल्याचे नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आदेश देऊनही पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नवलकर मार्केट रखडल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील अनेक भुखंड ताब्यात घेऊन नावावर करण्यास टाळाटाळ का केली जाते, असा सवाल राजू पेडणेकर, रमाकांत रहाटे यांनी केला. या विषयावर आयुक्तांसोबत विशेष बैठक बोलावून मार्ग काढा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अशा अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाल्याचे सदस्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. तर  मुंबईतील असे 2100 भूखंड पालिकेच्या नावावर करून घेण्यासाठी पालिकेची प्रक्रिया सुरू असल्याचे यावेळी उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी सांगितले. यापैकी 400 भूखंड पालिकेच्या नावावर करण्यास मंजुरीही मिळाल्याचे ते म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरातील हे भूखंड पालिकेच्या नावावर करून घेण्यासाठी कलेक्‍टर यांच्याकडे दर तीन महिन्यांनी बैठक आयोजित होत असल्याचेही त्यांनी त्यानी सांगितले  यावेळी सुधार समिती अध्यक्षानी पालिकेच्या ताब्यातील भूखंड नावावर करण्याची प्रक्रिया वेगाने करावी असे आदेश दिले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget