"रुईया फिल्मोत्सव 2018",मोठ्या उत्साहात संपन्न.

"रुईया फिल्मोत्सव 2018",मोठ्या उत्साहात संपन्न.


फिलमोत्सवात उपस्थित विद्यार्थी

रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या मराठी बी.एम.एम विभागाचा वार्षिक फिल्मोत्सव ६ व ७ ऑगस्ट २०१८ रोजी मोठ्या उत्साहात  पार पडला.पहिले महायुद्द १९१८ साली संपले, यंदा या घटनेला १०० वर्षे पूर्ण होतील , म्हणूनच यंदाच्या फिल्मोत्सवाची थीम होती "युद्ध आणि सिनेमा".

            मागच्या शतकातील या युद्धांचा जगावर दूरगामी परिणाम दिसून येतो.युद्धाने नवीन सामाजिक , आर्थिक, राजकीय समीकरणे जन्माला आली.यांचा वेध या दोन दिवसीय फिल्मोत्स्वात घेण्याचा प्रयत्न केला गेला.फिल्मोत्सवाची सुरुवात लेथ जोशी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अजिंक्य म्हाडगुत आणि क्षितीज सरोदे यांच्या सुसंवादाने झाली. या चित्रपट निर्मिती च्या वेळी त्यांना आलेले अनुभव त्यांनी शेअर केले.समारोपाच्या वेळी सिने अभ्यासक अभिजित देशपांडे यांनी चित्रपट पाहणे आणि तो अभ्यासणे यातील फरक नेमक्या भाषेत समजावून सांगितला. महायुद्ध आणि सिनेमा यातील नातेही त्यांनी उलगडून दाखवले.
त्यानंतर चंद्रशेखर नेणे यांनी आपल्या अनोख्या शैलीत युद्ध आणि त्यातील अस्पर्शित मुद्दे यांवर प्रकाश पाडला .   
             या फिल्मोत्सवाच्या  वेळी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील घटनांचा वेध घेणारे चित्रप्रदर्शन अर्थात wall of war साकारण्यात आली होती.या फिलमोत्सवाचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर अस्वाद घेतला. दरवर्षी अशाच नविन-नविन थीम घेऊन रुईया महाविद्यालय फिलमोत्सवाच आयोजन कराव, अशी आशा फिलमोत्सवात विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget