191 झाडे कापण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजूरी शिवसेनेचा विरोध

191 झाडे कापण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजूरी शिवसेनेचा विरोध

मुंबई म ( प्रतिनिधी ) – विकासाच्या नावाखाली पालिकेने पालिका प्रशासनाने अजूनही झाडांची कत्तल सुरूच ठेवली आहे ‘मेट्रो’ आणि ‘आयआयटी’च्या विविध कामांसाठी पालिकेने आता चक्क 191 झाडे तोडण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरण समितीत आज मंगळवारी दिली या झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने  विरोध केला. मात्र याकडे पालिका आयुक्तांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत मनमानीपणे प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे
  पालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या नावाखाली हजारो झाडाची कत्तल केली आहे अजूनही याच नावाखाली पालिकेने झाडांची कत्तल सुरूच ठेवली आहे वृक्ष प्राधिकरणाने १६ जून २०१० मध्ये अंधेरी पूर्व येथील ९ झाडे पुनर्रोपणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र ही झाडे मरण पावल्यामुळे तोडण्यासाठी आणि त्या ठिकाणच्या आणखी ९ झाडांच्या पुनर्रोपणासाठी आजच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्तावावर जोरदार आक्षेप घेत संबंधित कंत्राटदाराने या झाडांची योग्य देखभाल केली नसल्यामुळेच झाडे मरण पावल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे झाडे तोडण्याच्या सर्व प्रस्तावांना शिवसेनेने जोरदार विरोध केला असताना आयुक्तांनी ‘अनुकूल-प्रतिकूल’ असा उल्लेख न करताच मनमानीपणे तब्बल १९१ झाडे तोडण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे
पहिल्या प्रस्तावात आयआयटीसाठी ३१, दुसर्‍या प्रस्तावात ७५, तिसर्‍या प्रस्तावात - ७४ तर चौथ्या प्रस्तावात मेट्रोसाठी ११ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तोडणे आणि पुनर्रोपण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या प्रस्तावांमधील झाडांमध्ये जंगली झाडे, ग्लिसिडिया (गिरीपुष्प), विलायती चिंच, बोर, पंगारा, निरगुडी, शेवगा, आंबा, कडूनिंब, बदाम, नारळ, उंबर, जांभूळ, पुत्रंजीवा, पेरू, पिंपळ, फळस, गुलमोहर अशा झाडांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणची पुनर्रोपण केलेली झाडे मरण पावल्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून घेतलेली प्रतिझाड चार हजारांची अनामत रक्कम पालिकेकडे जमा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिवाय पुुन्हा झाडे तोडण्यासाठी सादर झालेल्या प्रस्तावांमध्ये संबंधितांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यामुळेच झाडे तोडणे आणि पुनर्रोपण करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे  
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget