जोगेश्वरी भुखंड गैरव्यवहार प्रकरणी पालिकेतील चार अधिकारी निलंबित तर 18 जणांवर ठपकाजोगेश्वरी भुखंड गैरव्यवहार प्रकरणी पालिकेतील चार अधिकारी निलंबित तर 18 जणांवर ठपका
मुंबई  ( प्रतिनिधी ) – मुंबईतील महत्त्वाच्या  जोगेश्‍वरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचा पालिका प्रशासनाने प्राथमिक चौकशी अहवाल मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला यामध्ये प्रामुख्याने पालिकेच्या विधी आणि नियोजन विभागातील  चार प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून कार्यकारी अभियंता अशोक शेंडगे, सहायक अभियंता विजयकुमार वाघ, दुय्यम अभियंता गणेश बापट आणि उपकायदा अधिकारी पी. व्ही. नाईक अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या खात्यांतील एकूण 18 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे पालिका र-थायी समितीत पडसाद उमटल्यानंतर पालिकेने ही कारवाई केली आहे   
जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळा प्रकरणी पालिकेत या अगोदर चांगलेच पडसाद उमटले होते सवॅपक्षीय सदस्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले होते त्यानंतर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित करत ही मोठी कारवाई केली आहे रुग्णालय, मनोरंजन मैदान आणि रस्त्यासाठी साडेतीन एकर भूखंड आरक्षित ठेवण्यात आला होता. पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन खात्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे तब्बल 500 कोटींचा भूखंड पालिकेला गमवावा लागला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी हे प्रकरण लावून धरून दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. अहवालामध्ये आयुक्तांच्या सहीचा गैरवापर करून भूखंडमालकाला मदत केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता अशोक शेंडगे, सहायक अभियंता विजयकुमार वाघ, दुय्यम अभियंता गणेश बापट आणि उपकायदा अधिकारी पी. व्ही. नाईक या अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच 18 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यातील काही अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयुक्त कुंदन आणि उपायुक्त नरेंद्र बर्डे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या चौकशी समितींची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी याप्रकरणी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget