पालिकेतर्फे आयोजित भव्‍य रोजगार मेळावा संपन्‍न

पालिकेतर्फे आयोजित भव्‍य रोजगार मेळावा संपन्‍न

मुंबई (प्रतिनिधी) –  महाराष्‍ट्र शासनाचा कौशल्‍य विकास,  रोजगार व उद्योजकता विभाग,  पालिका व नागरी उपजिविका अभियान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मुलुंड (पूर्व) च्‍या मिठागर मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत आज गुरुवारी सकाळी आठ ते चार या वेळेत आयोजित भव्‍य रोजगार मेळावा मोठया उत्‍साहात संपन्‍न झाला. या मेळाव्‍यात जवळपास अडीच हजार बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्‍त झाला.
अल्‍पशिक्षित दहावी व बारावी पास/ नापास तसेच पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले,  आयटीआय येथून प्‍लंबर इलेक्‍ट्रीशियन,  एअर कंडिशनिंग,  रेफ्रीजरेशन रिपेरिंग क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्‍या १८ ते ३५ वयोगटातील कुशल,  अकुशल  व दिव्‍यांग युवक -  युवतीकरिता तसेच हॉटेल रेस्‍टारेंट,  हाऊस किपींग,  क्रुझ लाईन या क्षेत्रातील आकर्षक वेतनाच्‍या भरपूर रोजगाराच्‍या संधी याठिकाणी उपलब्‍ध करण्‍यात आला होता. हजारो विद्यार्थ्‍यांनी या रोजगार मेळाव्‍याला भेट दिली. पालिकेने सहाय्यक आयुक्‍त (नियोजन) यांच्‍या मार्गदर्शनाखाली अश्‍याप्रकारच्‍या रोजगार मेळाव्‍यात प्रथमच सहभाग नोंदविला होता 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget