राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांसह अधिकाऱ्यांची नावे दिली खड्ड्याना खड्डे न बुजल्यास मोठे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांसह अधिकाऱ्यांची नावे दिली खड्ड्याना
खड्डे न बुजल्यास मोठे आंदोलन

  मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) –  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे वारे संपूर्ण महानगरीत वाजू लागले आहेत या मुंबापुरीत यंदा कुठेही खड्डे पडणार नाही असा दावा करणाऱ्या पालिकेचे पोलखोल पावसाने केले असून शहरासह उपनगरातील रस्त्यांवर खड्डयांनी घरोबा केला आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पण हे खड्डे बुजवण्यात अद्यापही पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांनी मुंबईकर हवालदिल झाला आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपरमधील रस्त्यांवरील खड्ड्यांची नामकरण करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या पालिका गटनेत्या राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. घाटकोपर पूर्व येथील यशवंतशेठ जाधव मार्गावर मोठे खड्डे पडले असून यावरील सर्व खड्ड्यांचे नामकरण हे महापालिका आयुक्त, महापालिका अतिरिक्त आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) असे करण्यात आले. यावेळी खड्ड्यांचे प्रतीकात्मक नामकरण करताना पालन हलवून गीत गात करण्यात आले.पालिका प्रशासनाने यंदा खड्डे पडणारच नाही असा दावा केला होता. तरीही रस्त्यावर खड्डे पडले. हे महापालिका प्रशासनाचे अपयश आहे. महापालिकेने प्राधान्य १,२ ची कामे केली. प्राधान्य ३ ची रस्त्यांची कामे सुरु आहेत. गेल्या वर्षी खड्डे बुजवले. या सर्वांची हमी कालावधी असताना आणि जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करूनही खड्डे पडतातच कसे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिका गटनेत्या राखी जाधव यांनी केला आहे. आज केवळ प्रतीकात्मक नामकरणाचा सोहळा पार पडत आंदोलन केले. पण हे खड्डे न बुजल्यास खड्ड्यांमध्ये नामकरणाचा फलक मोठे आंदोलन छेडण्यात
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget