जांभुळपाडा -कळंब मार्गवरील मोरी खचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता 

जांभुळपाडा -कळंब मार्गवरील मोरी खचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता


सुधागड-पाली -
सुधागडात गेल्या दहा-बारा दिवसापासुन पावसाने हाहाकार माजोला असुन सुधागड वासीयांची दैना उडवली आहे.गेल्या पावसात पाली-खोपोली महामार्गचा रस्ता वाहून गेल्याची घटना ताजी असताना.

सार्वजनिक बांकाम विभागांच्या अधिकार क्षेत्रात येणा-या जांभुळपाडा कळंब मार्गाची मोरी खचल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

तसेच नव्याने केलेल्या रस्ताची मोरी खचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 जांभुळपाडा कळंब या मार्गवर असलेली मोरी खचल्या गेल्याने अनेक गावांचे संपर्क तुटण्याचे धोका निर्माण झाले आहे.तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्याथ्यींना ही समस्यांना तोड द्यावे लागणार असल्याने बोलले जात आहे.

 सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या मोरीची लवकरातलवकर दुरुस्त करुन जांभुळपाडा कळंब रस्ता वाहतुकीसाठी पुर्वव्रत करुन द्यावे.

जांभुळपाडा -कळंब हा रस्ता अनेक गावाला जोडणारा महत्वाचा दुवा असुन हा मार्ग घोडपापड ,कळंब ,मुळशी,कैलोशी,कणी धनगरवाडी ,जाधववाडी,गाठेमाळ ,तसेच या मार्गावरु नवघर,असरे,फलसुंडे,कासारवाडी या खेडे गांवांना जोडणारा हा  महत्वपुर्णा रस्ता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व बाबींवर लक्ष देऊन खचलेल्या मोरीची तातडीने पहाणी करुन संबंधीत ठेकेदारांवर ही कारवाई व्हावी अशी ही मागणी होत आहे.खचलेल्या मोरीचे काम त्वरीत करण्यात यावे  अशी मागणी पंचकृषीतल्या सर्व सामान्य जनतेतून होत आहे.           
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget