भांडूपमध्ये आता तयार होणार जपानी उद्यान

भांडूपमध्ये आता तयार होणार जपानी उद्यान 

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या भांडूपमध्ये आता जपानी पध्दतीचे उद्यान तयार होणार आहे आकर्षक स्वरूपाच्या या उद्यानाला चक्क चार कोटी खर्च केला जाणार असून  या निधीची तरतूद पालिकेने केली असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे. मुंबईकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी हे नव्याने तयार होणारे उद्यान पर्वणी ठरणार आहे.
मुंबईत पावसाचे पाणी झिरपण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे मुंबईत मोठया प्रमाणात पाणी भरत असल्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी म्हटले होते. त्यामुळे यापुढे उद्याने तयार करताना मोकळी जागा शिल्लक ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. उद्याने आणि मैदानातील पेव्हर ब्लॉक आणि कॉंक्रीटीकरण करण्यावर त्यांनी निर्बंध आणले आहेत. आता या नव्या उद्यानात मोकळी जमीन कशी शिल्लक राहील आणि आकर्षक उद्यान कसे होईल यावर भर दिला जाणार असल्याचे समजते. उद्यानाच्या कामासाठी मे. के. के. थोरात यांची नियुक्ती केली आहे. हे उद्यान पूर्ण करण्यासाठी अकरा महिन्यांचा कालावधी कंत्राटदाराला देण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजूरीसाठी प्रशासनाने हा प्रस्ताव आणला असून येत्या बुधवारी या प्रस्तावाला मंजूूरी मिळण्याची शक्‍यता आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल असा विश्‍वास उद्यान विभागाने व्यक्त केला आहे. या कामासाठी चार कोटी 32 लाख रुपये खर्च येणार आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget