माहूर तालुक्यातील नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाची.चौकशीची मागणी


माहूर तालुक्यातील नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाची.चौकशीची मागणी 

नांदेड प्रतिनिधी

शासन विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी युध्द पातळीवर काम करीत आहे. माहूर तालुक्यात   नालासरळीकरण व सीमेंट  बंधाऱ्याची  केलेली कामे निकृष्ट दर्जाची  व थातूर -मातूर स्वरूपाची झाल्याच्या अनेक तक्रारी केल्या गेल्या.मात्र सदरची कामे गूत्तेदाराच्या नावे आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याने त्या तक्रारीकडे  संबधीत  यंत्रणाच  हेतूपूरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने  शासनाच्या मुळ उद्देशालाच खिळ बसत असल्याचे वास्तव झालेल्या पावसाने उजागर केले आहे.
               यावर्षी माहूर  तालुक्यात अनेक गावामध्ये नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आलीत.  सदरच्या कामातील फोलपणा पहिल्याच पावसात उघडकीस आला आहे.अशाच एका प्रकरणी  तालुक्यातील मच्छिंद्र  पार्डी येथील  पोलीस पाटील अरुण हिरासिंग पवार यांनी माहूर तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीची  अद्याप काही  चौकशी झालीच  नाही.मात्र याच आशयाच्या तक्रारीच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी महोदयानी  उपविभागीय अधिकारी किनवट यांचे मार्फत माहूरच्या  तहसीलदारांना चौकशी करण्याचे  निर्देश दिले असल्याने  चौकशी झाल्यास सत्यता उजागर   होण्याची अशा निर्माण झाली आहे. 
          सदरील कामे लघुपाट बंधारे विभागा  (स्थानिकस्तर )मार्फत .गूत्तेदाराचे नावे  एका पक्षाच्या कार्यकर्त्यानी  केली असल्याने  स्वाभाविकच ती थातूर - मातुर स्वरूपाची व कुणावर तरी अन्याय करणारीच असणार यात मुळीच शंका नाही.
      या प्रकरणी जर चौकशी झाली नाही तर आपण आमरण उपोषणाला बसू असा अरुण हीरासिंग पवार या वयोवृद्ध पोलीस पाटलाने संबधीतांना दिलेल्या तक्रारीतून इशारा  दिला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget