ना. म. जोशी मार्गावरील अपोलो मिलजवळील अनधिकृत बांधकाम तोडले २००८ मध्ये पर्यायी जागा देऊनही पदपथावरील जागा सोडण्यास टाळाटाळ मा. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाच्या 'जी / दक्षिण' विभागाची धडक कारवाई

ना. म. जोशी मार्गावरील अपोलो मिलजवळील अनधिकृत बांधकाम तोडले
२००८ मध्ये पर्यायी जागा देऊनही पदपथावरील जागा सोडण्यास टाळाटाळ
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाच्या 'जी / दक्षिण' विभागाची धडक कारवाई

महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागातील ना. म. जोशी मार्गाच्या पदपथावर उद्भवलेले अनधिकृत बांधकाम नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आले आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार व महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त श्री. नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून व्यवसायिक वापर करण्यात येत असलेले हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित पात्र अतिक्रमण धारकास वर्ष २००८ मध्येच दादर परिसरात पर्यायी जागा देण्यात आली होती. तथापि, संबंधितांद्वारे महापालिकेच्या विरोधात मा. न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने मा. न्यायालयाने नुकताच महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पादचा-यांना अडथळा ठरणारे पदपथावरील हे बांधकाम तोडण्यात आले आहे, अशी माहिती 'जी दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कॉम्रेड गणाचार्य चौकाकडून लोअर परेल स्टेशनकडे जातानाच्या ना. म. जोशी मार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियम - सोनल पेट्रोलपंपाजवळ आणि अपोलो मिलच्या फाटकाजवळील पदपथावर गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एक अनधिकृत बांधकाम उद्भवले होते. त्याठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय होत होता. हे बांधकाम पदपथावर असल्यामुळे पादचा-यांना चालण्यास अडथळा होत होता, ज्यामुळे अनेक वेळा पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागायचे; परिणामी रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा होण्यासोबतच पादचा-यांनाही संभाव्य धोका असायचा.

वरील बाबी लक्षात घेऊन सदर अनधिकृत बांधकामासंबंधी पात्र धारकाला वर्ष २००८ मध्येच नायगाव मंडई, दादर येथे पर्यायी जागा देण्यात आली होती. मात्र, संबंधितांद्वारे मा. न्यायालयात दाद मागण्यात आली होती. याबाबत मा. न्यायालयाने नुकताच महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. ज्यानंतर सदर अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाचे ३५ कामगार – कर्मचारी - अधिकारी देखील या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईसाठी १ जेसीबी, २ गॅस कटर, २ ट्रक यासह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्री वापरण्यात आली. संबंधित अनधिकृत बांधकाम हटविण्यात आल्यानंतर पदपथावरील सदर ठिकाणी तात्काळ योग्य ते बांधकाम करण्यात येऊन पदपथ सलग करण्यात आला आहे, अशीही माहिती श्री. देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget