धुक्यात हरावला बोरघाट ; डोंगराळ भागातून पडणारे धबधबे पर्यटकांना करतायेत आकर्षित

धुक्यात हरावला बोरघाट ; डोंगराळ भागातून पडणारे धबधबे पर्यटकांना करतायेत आकर्षित


             अल्पेश करकरे-  मुंबई पुणे महामार्गावर असणारे खंडाळा बोरघाट या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकाना वेगळी पर्वणीच मिळते. डोंगराळ भागातून पडणारे पांढरे शुभ्र धबधबे चोही बाजूने हिरवळ अशा निसर्ग रम्य वातावरणात मुंबई - पुण्यासह महाराष्ट्राच्या अन्य भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊन पर्यावरणांचा आंनद लुटत असतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने पर्यटकांची वर्दळ मोठी आहे, मात्र सध्या बोरघाटात धुक्याचे सावट असल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी जागोजागी पर्यटक दिसत असून धुक्यात हरविले बोरघाट अशी स्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे पर्यटक मनमोहक होऊन भिजण्याचा आनंद पावसात घेताना दिसत आहे.
     
  खोपोली शहराला लागूनच बोरघाट सुरु होतो, पावसाळ्यात सर्वत्र हिरवा शालू या घाटाला दिसत असून मुंबई-पुणे महामार्ग या ठिकाणाहून जात असल्याने प्रवास करताना येथील वातावरण पर्यटकांना आकर्षित करत असल्याने अनेक प्रवासी या बोरघाटात जागोजागी दिसत आहेत. या ठिकाणी डोंगराळ भागातून पडणारे धबधबे तर हिरवळ अशा निसर्गरम्य वातावरणाला सध्या धुक्याची जोड मिळाल्याने पर्यटकांना वेगळी पर्वणी मिळाली असल्याचे दिसत असून अनेक प्रकारची दुकाने या ठिकाणी असल्याने या निसर्गाचा आनंद लुटताना पर्यटकांना पावसात ही भिजताना वेगळा आनंद मिळत असल्याचे पर्यटक सांगत आहेत. या ठिकाणाहून द्रुतगती महामार्गावरील एका लाईनीत वाहनांच्या रांगा त्याच बरोबर खोपोली शहर ही वसलेले आकर्षक दिसत आहे. त्यामुळे धुक्यात हरविलेल्या बोरघाटात पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत.

 खोपोली शहरातून मुंबई पुणे महामार्ग गेला असून या ठिकाणाहून हजारो प्रवासी खाजगी वाहनाने प्रवास करताना या ठिकाणी नागमोडी वळणावरून निसर्ग रम्य वातावरण आपोआप भुरळ घालत असतो शांत वातावरणात व धुक्याचा आनंद पावसाळ्यात हिरवेगार झालेले डोंगर हे बोरघाटाचे आकर्षण असल्याने दररोज हजारो पर्यटक ठीक ठिकाणी थांबून आनंद घेत असतात
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget