मुंबईच्या रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे पालिका सभागृहात चांगलेच पडसाद

मुंबईच्या रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे पालिका सभागृहात चांगलेच पडसाद

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – दरवर्षी प्रमाणे यंदाही कोटयावधी रुपये खर्चनही मुंबईच्या रर-त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या प्रकरणी आज गुरुवारी पालिका सभागृहात चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरले  खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली असून आहे दोषी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली या आरोपांची गंभीर दखल घेत मुंबईतील रस्त्यावरील खड्डे येत्या 48 तासांत बुजवले जातील, खड्डे चुकीच्या पद्धतीने बुजवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले जातील, अशी पष्ट ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल दिली

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे या मुंबापुरीतील रर-त्यांवर खड्डे पडू नयेत म्हणून पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करते मुंबईला सलग चार दिवस पावसाने झोडपले. मुंबई जलमय झाली. वाहतूक कोंडीने रस्ते ब्लॉक झाले. रस्त्यांची दैना झाली. रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. आज गुरुवारी पालिकेच्या सभागृहात या प्रकरणी कॉंग्रेसचे पालिका गटनेते रवी राजा यांनी निवेदन केले. खड्ड्यांप्रकरणी दोषी कंत्राटदारांविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. दोषी कंत्राटदार आणि भ्रष्ट पालिका अधिकारी हेच खड्ड्यांना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे का पडतात असा संतप्त सवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनाला केला. सर्वच प्रभागातील रस्ते खड्डयांनी व्यापले असल्याबद्दल प्रशासनाच्या निष्क्रीय कारभाराचे नगरसेवकांनी वाभाडे काढले. हे अजून किती दिवस मुंबईकर सहन करणार आहे, असा सवाल विचारत कंत्राटदार आणि प्रशासन यांच्यावर हल्लाबोल केला. पालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी रस्त्यांतील खड्ड्यांबाबत आज पालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तातडीने उपायोजना करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget