कोट्यवधीची तरतूद असूनही मुंबईकरांना आरोग्याच्या सुविधा अपूऱ्या पालिका सभागृहात चांगलेच पडसाद


कोट्यवधीची तरतूद असूनही मुंबईकरांना आरोग्याच्या सुविधा अपूऱ्या
पालिका सभागृहात चांगलेच पडसाद
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपयांची तरतूद अथॅसंकल्पात करते मात्र आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत आरोग्य खाते आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.याचे पडसाद आज गुरुवारी पालिका सभागृहात चांगलेच उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरत. रुग्णालयांमधील समस्यांचा पाढाच वाचला .
मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका आरोग्य सेवा सुविधा पुरवत आहे यासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये अथॅसंकल्पात तरतूद करत आहे यंदा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे मात्र एवढा पैसा खर्च करून ही लोकांना चांगली सेवा सुविधा मिळत नाही .पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, 16 उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, आरोग्यकेंद्र आदींच्या माध्यमातून पालिका आरोग्य सुविधा पुरवते. बाह्य रुग्ण विभागातून वर्षभरात सुमारे एक लाख तीस हजार रुग्णांवर इलाज केले जातात. केईएम रुग्णालयांत जवळपास 52 हजार, लोकमान्य टिळक रुग्णालयांत 40 हजार आणि नायर रुग्णालयांत 30 हजार याप्रमाणे छोट्या - मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात. मात्र मुंबई शहरांत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांचा वाढता भार लक्षात घेता, पालिका पुरवत असलेली रुग्णालयीन सेवा सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत कमी पडत आहे. आरोग्य खाते आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्यात समन्वय नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयातले महागडे उपचार परवडत नसल्याने गरीब रुग्ण पालिकेच्या रुग्णालयाचा आधार घेतात. मात्र अपुऱ्या सुविधांमुऴे महत्वाच्या चाचण्या, शस्त्रक्रियांसाठी तीन -तीन महिने प्रतीक्षा करावी लागते असून वेळेत उपचार न झाल्याने रुग्ण दगावतो अशी कैफियत कॉंग्रेसचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी आज गुरुवारी हरकतीच्या मुद्‌द्‌याद्वारे पालिकेच्या सभागृहात माडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पालिकेने रुग्णालये बांधण्याकरीता ज्या खासगी संस्थांना जागा दिल्या आहेत. अशा संस्थांच्या रुग्णालय व्यवस्थापनावर अंकुश ठेवून पालिकेच्या आरोग्य खात्याने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणीही त्यांनी केली. आझमी यांच्या हरकतीच्या मुद्द्याला नगरसेवकांनी पाठिंबा देत असुविधांबाबत संताप व्यक्त केला. प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेतली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget