मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांची बैठक

मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांची बैठकबृहन्मुंबई महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभाग क्षेत्रातील पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्टेशनजवळ ना. म. जोशी मार्ग (डिलाईल पूल) व गणपतराव मार्ग यांना जोडणा-या पुलाबाबत मा. आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली जी दक्षिण विभागातील लोकप्रतिनिधी व मध्य व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष बैठक आज महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मा. आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी खालील निर्देश दिले. / या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.

स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित रेल्वे अधिकारी, बृहन्मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी, वाहतूक पोलीस व मुंबई पोलीस यांनी उद्या या पुलाची पाहणी करुन या पुलावरील कुठला भाग, कुठल्या प्रकारच्या वाहतूकीसाठी खुला करता येऊ शकतो, याचा निर्णय घ्यावा. हा निर्णय घेताना पादचारी, सायकल, दुचाकी, चारचाकी वाहने व अवजड वाहने; यापैकी कुठल्या प्रकारच्या वाहतूकीसाठी परवानगी देता येऊ शकते? याचाही स्पष्ट निर्णय घ्यावा.
या पुलाच्या निष्कासनासाठी अद्याप कंत्राटदाराची नेमणूक झालेली नसल्याने या पुलाची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) रेल्वेने पुन्हा एकदा त्यांच्या पातळीवर 'सेकंड ओपिनियन' च्या रुपाने करुन घ्यावी. ही तपासणी करताना सदर पुलावरुन कोणत्या प्रकारच्या वाहतूकीला मर्यादित स्वरुपात परवानगी देता येऊ शकते, याचीही चाचपणी करावी. +या दुस-या तपासणीचा अहवाल मान्य किंवा अमान्य करण्याचा अधिकार रेल्वेचा असेल.

 रेल्वे कायदा - १९८९ च्या कलम १७ व १९ नुसार रेल्वे हद्दीतील पुलांची उभारणी रेल्वेने करावी, परंतु यासाठीचा सर्व खर्च महापालिका करेल. तसेच महापालिका हद्दीतील पुलासाठीचा पोहोच मार्गाचे (Approach Road) बांधकाम महापालिकेने करावे. हे बांधकाम महापालिकेने रेल्वेकडून दिल्या जाणा-या आरेखनांनुसार करावे. यासाठीचा खर्च महापालिका करेल.

 रेल्वेने त्वरित या पुलाच्या निष्कासनासाठी (Demolition) कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु करावी.

 या बैठकीला आमदार श्री. अजय चौधरी, आमदार श्री. सुनील शिंदे, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष श्री. आशीष चेंबूरकर, नगरसेविका श्रीमती स्नेहल आंबेकर व श्रीमती किशोरी पेडणेकर, मध्य व पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. विजय सिंघल, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. रमेश पवार, महापालिकेच्या पूल खात्याचे प्रमुख अभियंता श्री. शीतलाप्रसाद कोरी, 'जी दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवेंद्रकुमार जैन यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget