अल्पसंख्याक विध्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास विलंब येत्या पालिका शिक्षण समितीत पडसाद उमटणार

अल्पसंख्याक विध्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास विलंब
येत्या पालिका शिक्षण समितीत पडसाद उमटणार
मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेचे नाव लौकिक आहे असे असताना मात्र पालिका शाळेत इयत्ता पाचवी आणि सातवीत शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यात विलंब होत आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेले तरी त्यांना हा भत्ता मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवला असून तशी  तक्रार पालिकेच्या शिक्षण समितीकडे केली आहे त्यामुळे येत्या शिक्षण समितीत यांचे चांगलेच पडसाद उमटणार आहेत
मुंबई पालिका शिक्षण विभाग हा आठ भाषेतून लाखो विद्यार्थीना शिक्षण देत आहे यासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये अथॅसंकल्पात तरतूद करत आहे असे असताना सुद्धा विध्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे अल्पसंख्याक विध्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास विलंब होत आहे याबाबत  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समिती अध्यक्षांकडे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्याबाबत पालिकेच्या शिक्षण खात्याने स्पष्टीकरण दिले. गेल्या 2013 नंतर शासनाकडून प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पालिका शिक्षण खात्याने नगरसेविका खान यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगत शासनाकडून पालिकेला जेव्हा प्रोत्साहन भत्ता रक्कम विलंबाने मिळाली. मात्र त्याचे वाटप त्वरित करण्यात आले, असे स्पष्टीकरण दिले आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित उपस्थितीसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. हा भत्ता त्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाची 70 टक्के उपस्थिती लक्षात घेऊन दिला जातो. ह्या भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. मात्र या विद्यार्थ्यांना मागील दोन- दोन वर्षांच्या प्रोत्साहन भत्त्याचे वाटप उशिराने करण्यात आले आहे. इयत्ता सातवीचे काही विद्यार्थी हे इयत्ता नववीमध्ये गेले होते. तर काही विद्यार्थी हे शाळा सोडून गेले होते, तर काहींचे पत्ते बदलले होते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना हा भत्ता देण्यात दोन दोन वर्षे विलंब होणे चुकीचे असून हा भत्ता वेळवेवर देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका खान यांनी केली आहे.
यासंदर्भातील विषय शिक्षण समितीच्या आगामी बैठकीत चर्चेला येणार आहे. त्यावरून खडाजंगी होण्याची शक्‍यता वतॅवली जात आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget