पालिका आयुक्तांनी ठाकूर व्हिलेज ते लोखंडवाला भागांत केली पहणी

पालिका आयुक्तांनी ठाकूर व्हिलेज ते लोखंडवाला भागांत केली पहणी

महापालिका आयुक्त  अजोय मेहता यांनी आज महापालिका क्षेत्रातील परिमंडळ ७ मधील काही ठिकाणांचा पाहणी दौरा केला. या दौ-या दरम्यान उपायुक्त (आयुक्त कार्यालय)  रमेश पवार, उपायुक्त (परिमंडळ-७) अशोक खैरे, संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर दौ-यातील महत्त्वाच्या बाबींचा तपशील घेण्यात आला तो पुढील प्रमाणे

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील परिमंडळ ७ अंतर्गत येणा-या आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर या तीन विभागांचा पाहणी दौरा केला गेला
कांदिवली परिसरात व आर दक्षिण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणा-या ठाकूर व्हिलेज ते लोखंडवाला पर्यंतच्या प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याबाबत (DP Road) पाहणी दौरा झाला .या रस्त्याच्या अनुषंगाने 'सिंग इस्टेट' परिसरातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याविषयीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले गेले.
पोईसर नदीपात्रातील काही ठिकाणी रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामांचा आढावा महापालिका आयुक्तांनी आजच्या दौ-यादरम्यान घेतला.
एम. जी. रोड जंक्शन ते बोरसापाडा जंक्शन यादरम्यानच्या स्वामी विवेकानंद मार्गावरील कामांची पाहणी केली. याच मार्गावरील एका ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने, त्याच ठिकाणच्या एका मोकळ्या भूखंडाचा काही भाग ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
महिंद्रा येलो गेटजवळील रस्त्यावर आढळून आलेले बोल्डर्स, राडारोडा (Debris) तातडीने हटविण्याचे आदेश दिले; जेणेकरुन रस्ता वाहतूक अधिक सुरळीतपणे होईल.
महिंद्रा येलो गेट ते महामार्गा दरम्यान पोईसर नदी लगत असलेल्या सर्व्हीस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्याचे निर्देशही ह्यात करण्यात आले
आकुर्ली रस्त्यालगतच्या फूटपाथच्या काही भागावर दुकानदारांनी वाढीव स्वरुपाची अतिक्रमणे केल्याचे आढळून आले. ही अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे तसेच पदपथ समतल (even) करण्याचे आदेश दिले
आकुर्ली रोडवरील ठाकूर हाऊस परिसरात गेल्या पावसाळ्यापर्यंत पाणी साचत होते. मात्र, या परिसरातील पाण्याचा निचरा अधिक योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने कल्व्हर्ट मध्ये सुधारणा करण्यासह इतर अभियांत्रिकीय बाबींची अंमलबजावणी करण्यात आली. ज्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या परिसरात पाणी साचले नाही. या अनुषंगाने देखील महापालिका आयुक्तांनी संबंधित उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्यासमवेत पाहणी केली.
मथुरादास रोडवर (Extension) प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रस्तावित पुलाच्या अनुषंगाने म्हाडाच्या भुखंडावरील बाधीत होणा-या ७३ बांधकामांबाबत म्हाडाच्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश केले
शांतीलाल मोदी मार्ग येथील पदपथावर आढळून आलेले बांबू तात्काळ हटविण्याचे आदेश दिले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget