पालिकेत आता कोल्डमिक्‍स हॉटमिक्‍सचा नवा वाद पालिका प्रशासन विरुद्ध र-थायी समिती..

पालिकेत आता कोल्डमिक्‍स हॉटमिक्‍सचा नवा वाद
पालिका प्रशासन विरुद्ध र-थायी समिती
वादग्रस्त विधान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे घोंगडे अजूनही पालिकेत वाजत आहे आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरले हॉटमिक्‍ससाठी नगरसेवक आग्रही असल्याचे वादग्रस्त विधान पालिका अधिकाऱ्यांनी केल्याने पालिकेच्या स्थायी समितीत नवा वाद सुरू झाला आहे.या वादग्रस्त विधान करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी समितीच्या बैठकीत केली त्यामुळे आता कोल्डमिक्‍स व हॉटमिक्‍स असा नवा वाद निर्माण झाला आहे पालिका प्रशासन विरुद्ध र-थायी समिती याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
  मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे या मुंबईकरांना रर-ते चांगले मिळावे यासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे मात्र पावसाला सुरुवात झाली कि रर-त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे सामाज्य निर्माण होते दरवर्षी मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे  मुंबईतील सन 2011 पासून गेल्या सात वर्षांमध्ये रस्ते बांधणी आणि खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या कारखान्यात तब्बल 13 कोटी 21 लाख 18 हजार किलो हॉटमिक्‍स चे उत्पादन केले गेले. यासाठी पालिकेने सुमारे 66 कोटीहून अधिक खर्च केल्याचा अहवाल कॅगने तयार केला आहे. यात मुंबई महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॉट मिक्‍स उत्पादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला असून नागपूर येथील अधिवेशनात हा अहवाल सादर केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. विभाग कार्यालयांबाहेर कोल्डमिक्‍स साहित्य पावसात भिजत असताना प्रशासन 450 रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचा दावा करत आहे. मात्र मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती भयानक आहे. हॉटमिक्‍ससाठी 65 कोटी रुपये कंत्राटदाराला दिले होते. परंतु, हॉटमिक्‍सच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची आयआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राजा यांनी केली. राजा यांच्या मागणीचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करत, प्रशासनाच्या कारभारावर चौफेर टीका केली.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी हॉटमिक्‍स किंवा कोल्डमिक्‍स वापरल्यानंतर ते वर्षभर टिकतील का? असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. हॉटमिक्‍ससाठी नगरसेवक आग्रही असल्याचे विधान करणाऱ्या अधिकाऱ्याने संबंधित विधानाचा खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यावरून पालिकेत नवा वाद सुरू झाला आहे. अधिकाऱ्यांनी केलेले पाप नगरसेवकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याचे सभागृह नेत्यांनी म्हटले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी विभागातील रस्त्यांच्या समस्येचा पाढा वाचला. मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते कसे मिळतील यासाठी समितीचे प्रयत्न असतात. मात्र अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांवर असे आरोप होत असतील, तर त्यांची चौकशी व्हायला हवी. आतापर्यंत पालिकेने हॉटमिक्‍स व कोल्डमिक्‍सद्वारे बुजविलेल्या खड्डयांची चौकशी करावी आणि चौकशी अहवाल समितीला सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget