मराठा आरक्षणासाठी खोपोली खालापुरातील समाज बांधव आक्रमक बुधवारी खोपोली खालापूर बंदची हाक खोपोलीत बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण

मराठा आरक्षणासाठी खोपोली खालापुरातील समाज बांधव आक्रमक बुधवारी खोपोली खालापूर बंदची हाक
खोपोलीत बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण
     ( प्रतिनिधी ) –     सर्वत्र मराठा आरक्षनासाठी शासनाकडे समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून मागणी करीत असताना शासन मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याने मराठा बांधवांनी वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याने काकासाहेब शिंदे याने गोदावरी नदीमध्ये जीव देऊन बलिदान दिल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटले असून त्यामुळे खोपोली शहरात त्यांना श्रध्दांजली अर्पण करून बुधवारी खोपोली बंदची हाक दिली असली, तरी चौक फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको करण्यात आला आहे.
 
मंगळवारी खोपोली शहरात मराठा समाजाचे बांधव जमा होऊन काकासाहेब  शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी ताराराणी बिग्रैट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा वंदना ताई मोरे, खोपोली शहर अध्यक्षा काचंनताई जाधव, शंभुराजे युवा क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष अंकुश हाडप, खालापूर तालुकाद्याक्ष विजय  रसाळ, मराठा आरक्षण सन्मवय समिती रायगड जिल्हाध्यक्ष हिरोजी देशमुख, कार्याध्यक्ष संजय जाधव, माजी नगरसेविका जिल्हा उपाध्यक्षा प्रीयाताई जाधव यांच्यासह खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, गटनेते नगरसेवक सुनील पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, नगरसेवक मोहन औसरमल, मनीष यादव, अमोल जाधव, समीर मसुरकर, माजी उप नगराध्यक्ष रमेश जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय देशमुख, कय्युम पाटील, अनिल सानप नगरसेविका प्रमिला सुर्वे, विनिता कांबळे, केवीना गायकवाड, संदीप पाटील ,हरीश काळे ,भाऊ सनस यांच्यासह आदी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget