पुणे-मुंबई महामार्गावर दोन कारचा अपघात; ७ जण ठार*

*पुणे-मुंबई महामार्गावर दोन कारचा अपघात; ७ जण ठार*


पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली असून या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

आज दुपारच्या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ दोन कार समोरासमोर भरधाव वेगाने आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भर रस्त्यात हा अपघात झाल्यानं दोन्ही मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पाऊस सरू असल्याने मदत कार्यात अडचण येत असल्याची माहिती आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget