*केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे सुपुत्र जीत आठवलेंचे अभिनय क्षेत्रात पदार्पण*केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे सुपुत्र जीत आठवलेंचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

मुंबई दि. 27 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.कुमार जीत आठवले यांची  प्रमुख भूमिका साकारलेल्या  "फिर तस्वीर बनाये" या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित  लघुचिञपटाचे उदघाटन येत्या  रविवार दि. 29 जुलै रोजी  सायंकाळी 5 वाजता मुंबईत बांद्रा पूर्वेच्या एम आय जी क्लब मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या लॉंचिंग सोहळ्यास केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले ; सौ सीमाताई आठवले आणि या सिनेमाचे दिग्दर्शक लेखक सह सर्व टीम उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रीय एकात्मतेवर  आधारित असणाऱ्या फिर तास्वीर बनाये या लघु चित्रपटात कुमार जीत आठवले यांच्यासह  श्रेया खाडे;श्रावस्ती मोरे;  श्री देशमुख; आर्यन फुलोरे;समर्थ सरकाळे; अंकित चोरमारे; सिराज अहमद; अभिजित गायकवाड; जगन्नाथ देशमुख; सुरेश मयेकर; नितीन मोहिते; रणजित; के पी तिवारी; रामेश्वरि ठेंगे; कुणाल भुंगे; आनंद कांबळे; या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघूपटाचे लेखन - संवाद प्रवीण भगत आणि अजित रुमडे यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शन प्रवीण भगत आणि आनंद खाडे यांचे असून छायांकन प्रवीण गाडे यांचे आहे.या लघुपटाची निर्मिती व्यवस्था प्रवण खाडे यांनी केली असून  रंगभूषा किशोर पिंगळे आणि सह दिग्दर्शक बाळासाहेब सोनटक्के आहेत.लघुपटाचे चित्रीकरण बोरीवली नॅशनल पार्क येथे करण्यात आले आहे. या लघुपटाच्या उदघाटन सोहळ्यासाठी  रिपाइं च्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा अभयाताई सोनवणे; युवक आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड ; प्रवीण मोरे;शाकुंतला आठवले; दिलीप व्हावळे; जगन्नाथ देशमुख; मनोहर खेडकर;सुधाकर बक्षी ; दिलीप कदम ; रमेश सांगळे; यांचे विशेष सायकार्य लाभले आहे. 

           
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget