प्लास्टिकवरची कारवाई थंडावल्याने किरकोळ विक्रेते निधाॅर-त

प्लास्टिकवरची कारवाई थंडावल्याने किरकोळ विक्रेते निधाॅर-त

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – प्लास्टिक नष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर प्लास्टिकविरोधी जोरात कारवाई सुरू झाली आणि नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती मात्र आता कारवाई थंडावल्याने किरकोळ विक्रेते निर्धास्त झाले आहेत. प्लास्टिकचा वापर पुन्हा सर्रास सुरू आहे. प्लास्टिकविरोधी कारवाई करणाऱ्या निरीक्षकांशी वादावादीचे प्रसंगही वाढत आहेत. त्यामुळे निरीक्षक आता पोलिस संरक्षणाची मागणी करत असल्याची माहिती पुढे येत आहे

  मुंबईकरांचा गळा घोटणा-या  प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर कारवाईसाठी मुंबई पालिकेने लगेच जोरात कारवाई करण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले. कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग ओढवत आहेत. निरीक्षक या सततच्या वादावादीला कंटाळले आहेत. काही ठिकाणी कारवाईत जाणीवपूर्वक अडथळा आणला जात आहे. काही ठिकाणी दमदाटी-दादागिरी करून कारवाईला विरोध केला जात आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाई करणारे निरीक्षकांना धक्काबुक्की किंवा हल्ला झाल्यास कारवाईदरम्यान पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही निरीक्षकांनी याबाबत उपायुक्त विशेष निधी चौधरी यांची भेट घेत संरक्षण देण्याची मागणी केली आहे. राज्यात 23 जूनपासून सुरू झालेल्या प्लास्टिकबंदीची 100 टक्के अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून सर्व 24 विभागांत जोरदार कारवाई सुरू आहे. सुरुवातीला कारवाई धडाक्‍यात झाली. त्यामुळे नागरिकांचे आणि व्यावसायिकांचेही धाबे दणाणले; मात्र कारवाईचा वेग मंदावल्याने व्यापारी प्लास्टिकचा सर्रास वापर करत असल्याचे चित्र 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget