महाड येथे गुरांच्या वाड्याला आग २ बैलांचा मृत्यू ; दीड लाखाचे नुकसान

महाड येथे गुरांच्या वाड्याला आग
२ बैलांचा मृत्यू ; दीड लाखाचे नुकसान

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील सव येथे काल मध्यरात्रीनंतर एका गुरांच्या वाड्याला आग लागून या आगीत संपुर्ण वाडा जळून भस्मसात झाला आहे. वाडयामध्ये बांधून ठेवलेल्या दोन बैलांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला असून वाङयातील पेंढा, वासे, लगी, भाळ, कवलेे या आगीत भस्मसात झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थांना शर्थीचे प्रयत्न करूनही ही आग विझवता आली नाही.

महाड तालुक्यातील सव येथील राहिवाशी रविंद्र गोपीचंद जाधव यांच्या घरापासून ५ ते ७ मिनीटाच्या अंतरावर असलेल्या जनावरांच्या वाडयाला शनिवारी मध्यरात्रीनंतर २ वाजण्याचे सुमारास अचानक आग लागली कौलारू असलेल्या या वाडया शेजारी असणाऱ्या घरातील लोकांना धूराचा वास येऊ लागल्याने बाहेर येऊन पाहीले असता रविंद्र जाधव यांचा वाडा जळत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी तातडीने जाधव यांना फोन करुन आगीची माहिती दिली मात्र ग्रामस्थ येऊन आग विझवे पर्यत वाडा ८० टक्के जळाला होता.

या आगीत वाडयातील २ बैल होरपळून मेले असून ५०० भारे पेंढा, लगी, भाल, वासे, कौल जळाली असून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

या आगीची माहिती समजताच महसुल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget