मुंबईकराना पालिका देणार कापडी पिशव्या पिशव्यांच्या वाटपासाठी नगरसेवक निधीत पाच लाखांची तरतूद

मुंबईकराना पालिका देणार कापडी पिशव्या

पिशव्यांच्या वाटपासाठी नगरसेवक निधीत

पाच लाखांची तरतूद

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – गेल्या अनेक दिवसांपासून प्लास्टिकचा विषय गाजत आहे प्लास्टिक नष्ट करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे  प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीनंतर कापडी पिशव्यांसाठी आता नगरसेवक निधीचा वापर होणार आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यासाठी नगरसेवक निधीमध्ये पाच लाख रुपयांची तरतूद करा, अशी मागणी करण्यात आली होती. या ठरावाच्या मागणीला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली आहे दरम्यान, हा प्रस्ताव सकारात्मक अभिप्राय देऊन राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.
मुंबईतील प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. प्लास्टिक वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे; परंतु केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपयांचा निधी वापरता येईल, अशा रीतीने निधी वापरासंबंधीच्या निकषांत सुधारणा करण्यात 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget