प्लास्टिक बाबत पालिका नगरसेवकांना विचारात घेत नाही पालिका सभागृहात नगरसेवकांचा आरोप

प्लास्टिक बाबत पालिका नगरसेवकांना विचारात घेत नाही

पालिका सभागृहात नगरसेवकांचा आरोप

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे वारे मोठ्या प्रमाणात गाजत असताना आता पुन्हा प्लास्टिकचा विषय गाजू लागला आहे आज गुरुवारी पालिका सभागृहात प्लास्टिकचा विषय चांगलाच रंगला होता सवॅपक्षीय सदस्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले    प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला एक महिना पूर्ण होत आला तरी याबाबत लोकांमध्ये जनजागृती नाही. प्लास्टिक बंदीबाबत पालिका नगरसेवकांना विचारात घेत नाही, हा नगरसेवकांचा अपमान असल्याचा आरोप सदस्यांनी केला,
   मुंबई गेल्या काही दिवसापासुन रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय गाजत आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता पुन्हा प्लास्टिकचा विषय गाजू लागला आहे  प्लास्टिक बंदीनंतर पालिकेने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. दंड न भरणाऱ्या 137 जणांना पालिकेने कोर्टात खेचले असून, 28 दिवसांत 40 लाख 80 हजारांची दंड वसूल केला आहे. मात्र प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला महिना होत आला तरी याबाबत जनजागृती केली जात नसल्याने मुंबईतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. कोणते प्लास्टिक वापरावे, कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणत्या प्लास्टिकला सद्या सूट देण्यात आली आहे, याबाबतची बहुतांशी नागरिकांना याची माहिती नाही. इतकच नाही, याबाबत नगरसेवकांनाही पालिका प्रशासनाने विचारात घेतलेले नाही. ट्‌वीटरवर याची माहिती दिली जाते, पण नगरसेवकांना दिली जात नाही, हा अपमान असल्याचे सांगत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. दुसरीकडे रिटेल व्यावसायिकांना प्लास्टिक बंदीतून सूट देण्यात आली आहे, मग फूल व्यावसायिकांना का नाही? पालिकेकडून हा दुजाभाव का? प्लास्टिकबंदी फक्त सर्वसामान्यांसाठी आहे, का असा सवाल गुरुवारी पालिका सभागृहात नगरसेवकांनी विचारला. प्लास्टिक बंदीबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे, प्लास्टिक बंदीला विरोध नाही, मात्र नियोजन आणि जनजागृती नसताना अंमलबजावणी केल्याने लोकांमध्ये नाराजी असल्याचे नगरसेवकांनी आपले मत व्यक्त केले या प्लास्टिक विषयावर पालिका सभागृहात चक्क 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget